ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर
  • Aavaj Daily Team
  • Wed 25th Jun 2025 04:57 pm

कराड/प्रतिनिधी : - 


श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा मंडळामार्फत आयोजित शिष्यवृत्ती परीक्षा २०२४-२५ चा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. इयत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार समारंभ मलकापूर येथे नुकताच पार पडला.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेतीमित्र अशोकराव थोरात यांनी आपल्या मनोगतात, "टोकाची बुद्धिमत्ता असणारा वर्ग म्हणजे श्री मळाई शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी," असे गौरवोद्गार काढले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागील शाळा, शिक्षक आणि पालकांच्या योगदानाचे विशेष कौतुक करत संस्थेच्या गुणवत्तावर्धक उपक्रमांचा आढावा घेतला.


संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका डॉ. स्वाती थोरात यांनी पाच वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या शिष्यवृत्ती परीक्षेचा उद्देश ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना शोधून त्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे, असल्याचे सांगितले. या परीक्षेच्या यशस्वी आयोजनामुळे सामान्य कुटुंबातील मुले उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले.


कार्यक्रमास संस्थेचे सचिव अशोकराव थोरात, शिवशंकर ज्वेलर्स कराडचे अविनाश जगताप, प्रियांका जगताप, केंद्रप्रमुख गणेश जाधव, संचालक सौ. शालिनी थोरात, पर्यवेक्षण प्रमुख आर.ए. कुंभार, चंद्रकांत कुंभार, भगवानरव पवार, पत्रकार अतुल काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. नीट पात्र विद्यार्थिनी सिद्धीका मुर्सल व इतर हितचिंतक पालक व विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. सुलोचना भिसे, सूत्रसंचालन सौ. सविता कोळी व सौ. कविता थोरात, सौ. करुणा शिर्के यांनी आभार मानले.


शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता सातवी (मराठी माध्यम) आर्या पवार - प्रथम (कन्या शाळा मलकापूर), वरदराज शिंदे - द्वितीय (आनंदराव विद्यालय पोतले) जान्हवी मोरे - तृतीय (आ.च. विद्यालय मलकापूर), संस्कृती गरुड, वेदिका गरुड, स्वस्ती देशमुख – उत्तेजनार्थ, इयत्ता चौथी  (मराठी माध्यम) अंशुल शिंदे - प्रथम (आदर्श प्राथमिक आगाशिवनगर), मंथन गरुड – द्वितीय, त्रिशा शिर्के – तृतीय, विराज पाटील व श्रेयस चव्हाण – उत्तेजनार्थ, इयत्ता सातवी (इंग्रजी माध्यम) सबा डांगे – प्रथम, धैर्यशील शिंदे – द्वितीय, समर्थ गुरव – उत्तेजनार्थ, इयत्ता चौथी (इंग्रजी माध्यम) अनुश्री साळुंखे व विश्वराज पवार – प्रथम, आराध्या वाळके – उत्तेजनार्थ. या कार्यक्रमात मागील वर्षीच्या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रत्येकी एक हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


उत्कृष्ट नियोजन हेच यशाचे गमक


माध्यमांशी संवाद साधताना डॉ. स्वाती थोरात यांनी, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा त्रिवेणी संगम, तसेच संस्थेचे प्रभावी नियोजन, हेच श्री मळाई शिष्यवृत्ती परीक्षा योजनेच्या यशाचे गमक आहे. परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होत असल्याचा त्यांनी पुनःउल्लेख केला.  





©2026. All Rights Reserved.