ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
फलटण तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त लंप्पी आजाराकडे पशुवैद्यकिय विभागाचे दुर्लक्ष,
  • निसार शिकलगार 
  • Fri 23rd Sep 2022 06:56 am

फलटण ; तालुक्यांतील ग्रामीण भागात लंम्पी या आजारांने बांधीत जनावरांचे प्रमाण वाढले असून लसीकरण करण्यात तालुका पशुवैद्यकिय अधिकारी व सबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामीण भागातील शेतकरी चिंताग्रस्त झाला असून उपचार, निदान, लसीकरण, मार्गदर्शन याकडे पशुवैद्यकिय विभाग डोळेझाक करत असल्याने तालुक्यात फारच गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

                  मिळालेल्या माहितीनुसार फलटण तालुक्यात सध्या 159 जनावरे बाधीत असून 11 जनावरे दगावली आहेत. असे असताना देखील तालुका पशुवैद्यकिय विभाग नेहमीसारखा झोपलेल्या आवस्थेत फक्त कागदी घोडे नाचवत आहे असा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. सदर रोग हा संसर्गजन्य रोग असल्याने उपचार करण्यापेक्षा रोग येवू नये या करिता प्रतिबंधात्मक उपाययोजना व रोग आल्यास त्याचा प्रसार होवू नये याकरिता बाहय किटकांवर नियंत्रण, जैव सुरक्षा नियमांचे पालन, निर्जतुंक द्रावणाच्या कीटकनाशकांची परिसरात फवारणी, इत्यादी आवश्यक या बाबीची काळजी घेणे जास्त महत्वाचे असून याबाबत पशुवैद्यकिय विभाग मार्गदर्शन करत नसल्यानें शेतकऱ्यांना खाजगी डॉक्टरांवर अवलंबून रहावे लागत आहे.

                  फलटण तालुक्यात म्हणावे असे लसीकरांनाला प्रधान्य दिले जात नसल्याने लंम्पी या आजारावर नियंत्रण आणि प्रतिबंध करण्यासाठी शेतकर्‍यांमध्ये प्रचंड मोठी नाराजी असून अनेक गावात लंम्पी बाधित जनावरांवर खाजगी डॉक्टरा मार्फत पैसे खर्च करून उपचार करून घ्यावे लागत असल्याने शेतकरी आर्थिक विवेचनामुळे चिंताग्रस्त झाला आहे. नावापुरते व कागदावरच काम करणाऱ्या तालुका पशुवैद्यकिय विभागाने कात झटकून काम करण्याची मागणी तालुक्यांतील शेतकरी वर्गातून होत आहे. अनेक भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या भागासाठी कोण पशू वैद्यकीय डॉक्टर आहे हेच माहित नसल्याने तसेच त्यांचे नाव व संपर्क क्रमांक माहीत नसल्याने संपर्क साधने शक्य होत नाही.

                      तालुका पशुवैद्यकिय अधिकारी व त्यांचे सहाय्यक डॉक्टर कोणत्याच माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने मार्गदर्शन, लसीकरण, निदान, उपचार याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती शासनाकडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याने शेतकरी अत्यंत काळजीत आहे. एकीकडे प्रशासनाकडून लसीकरण व मार्गदर्शन बाबत उपाययोजना करण्याचे शासनाकडून आदेश होत असताना मात्र फलटण तालुक्यात प्रत्यक्षात कोणतीच पशुवैद्यकीय सेवा ग्रामीण स्तरावर पोहोचत नसल्याचे चिन्ह आहे. फलटण शहरात व ग्रामीण भागात अत्यंत वाईट अवस्था सद्यस्थितीला असून यामध्ये लवकर बदल न झाल्यास लंम्पी या आजारांने संपूर्ण तालुका बाधित होऊन कोट्यावधीचे शेतकऱ्याचे पशुधनाचे नुकसान होणार आहे.



©2026. All Rights Reserved.