इस्लामपूर : थेट तहसील कार्यालयात घुसून प्रशासन आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत धरणग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेतला. थकीत कबजेपट्टीच्या नोटीसा मागे घ्याव्यात यासह इतर मागण्यांसाठी इस्लामपूर ( सांगली) येथे धरणग्रस्तांचे सोमवार पासून आंदोलन सुरू आहे.
धरणग्रस्त घुसले तहसीलदार कार्यालयात...
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचा निरोप येत नाही तो हलणार नसल्याचा दिला इशारा..
इस्लामपुरात तणाव..
इस्लामपूर :
थेट तहसील कार्यालयात घुसून प्रशासन आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत धरणग्रस्तांनी आक्रमक पवित्रा घेतला. थकीत कबजेपट्टीच्या नोटीसा मागे घ्याव्यात यासह इतर मागण्यांसाठी इस्लामपूर ( सांगली) येथे धरणग्रस्तांचे सोमवार पासून आंदोलन सुरू आहे.
जो पर्यत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बैठकीचा निरोप येत नाही तो पर्यत तहसीलदार कार्यालयातून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंदोलकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे पोलिसांचीही तारांबळ उडाली होती. आंदोलकांच्या गर्दीने तळ व पहिला मजला पूर्ण भरून गेला होता. घटनास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
गेल्या ४० वर्षांपासून आपल्या विविध
मागण्यांसाठी आंदोलने करणाऱ्या वारणा धरणग्रस्त आणि चांदोली प्रकल्पग्रस्त कुटुंबे आज दुसऱ्या दिवशी थेट तहसील कार्यालयात घुसली.
धरणग्रस्त संघटनेचे नेते गौरव नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दिवसभर भर उन्हात बसून आंदोलन केले.
रात्री उशिरा पर्यंत यावर अधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा निघाला नाही.
आज मंगळवारी सर्व आंदोलक पुन्हा तहसील कार्यालयासमोर एकत्र जमले. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. सकाळी आंदोलनाला सुरुवात करताना पुन्हा महिलांनी संघर्ष गाणी गात वातावरण तापवले यातच उन्हाचा चटका तीव्र होऊ लागल्याने प्रशासन लक्ष देत नाही तर आत घुसण्याचा गनिमी कावा यशस्वी करत तहसील कार्यालयातील तळ मजल्यावर ठिय्या मारत ताबा घेतला.
येथे माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे नेते सम्राट महाडीक यांनी आंदोलस्थळी येत पाठिंबा जाहीर केला.
सरकार असले काय आणि नसले काय, मला फरक पडत नाही...!
सरकार असले काय आणि नसले काय, मला फरक पडत नाही. सरकार कुणाचेही असुदे. वेळ प्रसंगी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर मंत्रालयाला धडक मारू..न्याय मागण्यासाठी आलेल्या आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका अन्यथा त्या अधिकाऱ्यांना इथे ठेवणार नाही. सरकार कधी सावकार होऊ शकत नाही मात्र महाविकास आघाडीचे सरकारने १२ टक्के व्याजासह या नोटीसा पाठवून अन्याय केला आहे.सदाभाऊ खोत
माजी मंत्री
©2026. All Rights Reserved.