लग्नाच्या मिरवणुकीत एका व्यक्तीने अचानक हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली. बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ढेबेवाडी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे.
लग्न मिरवणुकीत हवेत गोळीबार
- परवानाधारक रायफलसह काडतूसे जप्त
ढेबेवाडी :
तळमावले, ता. पाटण येथील एका लग्न समारंभात लग्नाच्या मिरवणुकीत एका व्यक्तीने अचानक हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली. बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी ढेबेवाडी पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेत त्याच्याजवळील परवानाधारक १२ बोअरची रायफल आणि १० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जितेंद्र जगन्नाथ कोळेकर ( वय ५१) असे ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी, पाटण तालुक्यातील तळमावले गावच्या हद्दीत काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाच्या गेटसमोर लग्नाच्या मिरवणुकीत एका व्यक्तीने बंदुकीतून हवेत तीन फैरी झाडल्या. यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पाटणचे डीवायएसपी विवेक लावंड यांच्यासह ढेबेवाडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत चौधरी यांनी घटनास्थळाला भेट दिली. शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी अधिक तपास करीत आहेत.
©2024. All Rights Reserved.