मेष
हा सप्ताह आपणासाठी सर्वसाधारण असेल. सप्ताहाच्या सुरुवातीला प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. आरोग्याच्या काही कुरबुरी जाणवतील. कुटुंबियांच्या काही चिंता सतावतील. मात्र जोडीदाराचे उत्तम सहकार्य लाभेल. उत्तरार्धात काही अडचणी, संकटांचा सामना करावा लागू शकतो. कोणावरही अती विश्वास ठेवू नये. मात्र जोडीदाराचे सहाय्य व प्रेम मिळेल. जोडीदाराच्या साथीने घरातील काही महत्त्वाची कामे हातावेगळी कराल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
वृषभ
हा सप्ताह आपणासाठी सर्वसामान्य असेल. कुटुंबियांसमवेत अतिशय आनंदात हा सप्ताह व्यतीत कराल. कुटुंबीयांचे उत्तम सहकार्य व आई-वडिलांचे प्रेम व आशीर्वाद प्राप्त होतील. काही महत्वपूर्ण निर्णय घेताना कुटुंबीयांची मदत घ्या. विचारपूर्वक निर्णय घ्या. सप्ताहाच्या मध्यात आरोग्याच्या तक्रारी सतावतील. योग्य ती काळजी घ्या. जोडीदाराचे मात्र भरभरून प्रेम व पाठबळ मिळेल. संततीही मनाप्रमाणे वागेल. सप्ताहाच्या अखेरीस काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
मिथुन
हा सप्ताह आपणासाठी चांगला असेल. परिवारात, कुटुंबात रममाण व्हाल. मात्र आपल्या वागण्या – बोलण्यातून आपली माणसे दुखावली जाणार नाही याची अवश्य काळजी घ्या. काही धाडसी व महत्त्वाचे निर्णय घ्याल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य व पाठबळ लाभेल. एकमेकांना समजुन घ्याल. घरातील बऱ्याच दिवसांपासून दुर्लक्षित व रखडलेली कामे या सप्ताहात पूर्ण कराल. भावंडांचे सौख्यही आपणास लाभेल. आपल्यातील काही सुप्त कलागुणांना उजाळा देऊन आपल्या आवडी निवडी, छंद यांची जोपासना कराल. सप्ताहाच्या उत्तरार्धात काही आरोग्यविषयक समस्या भेडसावतील. त्यामुळे सजगता बाळगावी.
कर्क
हा सप्ताह आपणासाठी चांगला असेल. कौटुंबिक,परिवारिक सौख्य चांगले लाभेल. परिवारासाठी काही खर्च संभवतात. कुटुंबीयांसमवेत सामंजस्याने वागणे हिताचे राहील.
त्यांच्या भावनांचा आदर करा. मुलाबाळांकडेही विशेष लक्ष द्यावे लागेल. जोडीदाराच्या मदतीने काही आर्थिक निर्णय मार्गी लावाल. ज्येष्ठ व्यक्तींची सेवा सुश्रुषा कराल. समाजातील दिनदुबळ्यांना मदत कराल. सेवाभावी संस्थांना मदत करण्यासाठीही पुढाकार घ्याल. विशेष मेहनत घेऊन समाजात मानसन्मान, प्रतिष्ठा प्राप्त कराल.
सिंह
हा सप्ताह आपणासाठी उत्तम असेल. कौटुंबिक, पारिवारिक सौख्याचा आनंद घ्याल. कुटुंबातील सदस्यांसमवेत रममाण व्हाल. आपल्या बुद्धिमत्तेचा योग्य वापर करून काही धाडसी निर्णय घेऊन इतरांना मदत, सहकार्य कराल. त्यातून आनंदाची प्राप्ती कराल. घरातील काही कामांचे योग्य नियोजन करून त्यानुसार कृती कराल. आपल्या आवडी-निवडी, कला, छंद जोपासण्यासाठी वेळ काढाल. प्रकृतीच्या काही कुरबुरी जाणवतील. योग्य काळजी घेणे आवश्यक राहील.
कन्या
हा सप्ताह आपणासाठी चांगला असेल. मात्र सप्ताहाच्या सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च संभवतात. इतक्या दिवसांपासून घेत असलेल्या मेहनतीचे, कष्टाचे फलित या सप्ताहात प्राप्त होईल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. योगाभ्यास व उपासनेसाठी उत्तम सप्ताह आहे आरोग्याच्या समस्या सतावतील. अनेक अडचणी, अडथळे यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे प्रकृतीची योग्य ती काळजी घ्यावी व आधीच सावधगिरी बाळगावी.
तुळ
या सप्ताहाची सुरुवात काहिशी मनस्तापदर्शक राहील. प्रकृतीच्या समस्या, अनावश्यक खर्च, नैराश्य, औदासिन्य जाणवेल. मात्र सप्ताहाच्या मध्यानंतर उत्तम सप्ताह जाईल. उत्साह, प्रसन्नता,आनंद यांचा अनुभव घ्याल. बऱ्याच दिवसानंतर भाग्याची, नशिबाची साथ मिळेल. दांपत्यजीवन मात्र काहीसे असमाधानकारक राहिलं. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. कुटुंबीयांची उत्तम साथ आपणास लाभेल. त्यांच्या समवेत अमूल्य वेळ व्यतीत कराल
वृश्चिक
हा सप्ताह आपणासाठी सर्वसामान्य असेल. काही अनपेक्षित लाभ वा प्राप्ती होऊ शकते. प्रियजनांच्या गाठीभेटी संभवतात. त्यांच्या समवेत वेळ मजेत जाईल. मानसिक, शारीरिक अस्थैर्य जाणवेल. खर्चाचा योग्य ताळमेळ साधणे अवघड होईल. त्यामुळे आधीच शांत चित्ताने व स्थिर बुद्धीने नियोजन करून ठेवणे श्रेयस्कर राहील. सप्ताहाचा उत्तरार्ध मात्र बर्यापैकी चांगला जाईल.
धनु
हा सप्ताह आपणासाठी चांगला असेल. जोडीदाराचे भरभरून प्रेम व पाठबळ आपणास लाभेल. कामाचा अतिरिक्त तणाव जाणवेल. काही महत्त्वाची कामे पूर्ण करण्याकडे, हातावेगळी करण्याकडे कल राहील. काही धार्मिक कार्यात इतरांना मदत, सहकार्य करण्यात पुढाकार घ्याल. काही सेवाभावी संस्थांसाठी काम कराल. त्यातून लाभाची, आनंदाची, सौख्याची प्राप्ती कराल. आपला आनंद इतरांसह द्विगुणित कराल. सप्ताहाच्या उत्तरार्धात मात्र काही अनपेक्षित खर्च, शारीरिक व्याधी यांना सामोरे जाऊ लागू शकते. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मकर
हा सप्ताह आपणासाठी चांगला असेल. कुटुंबीयांबरोबर वेळ आनंदाने घालवाल. भावंडांचेही सौख्य लाभेल. दाम्पत्य जीवनात काही वादविवाद, गैरसमज होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. परस्परांना समजून घेणे, एकमेकांच्या निर्णयाचा आदर करणे आवश्यक राहील. काही कामांचा अतिरिक्त ताण येऊन त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. म्हणून शांतपणाने नित्य काम करावे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. प्रकृतीची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्यावी.
कुंभ
हा सप्ताह आपणासाठी सर्वसामान्य असेल. सप्ताहाच्या सुरुवातीला काही चिंता, काळजी सतावतील. आरोग्याच्या तक्रारी डोके वर काढतील. कोणत्याही प्रलोभनांना, आमिषांना बळी पडू नका. कोणताही निर्णय घेताना सर्व बाजूंनी विचार करून योग्य निर्णय घ्या. सप्ताहाचा उत्तरार्ध मात्र चांगला जाईल. संततीसौख्य, वैवाहिकसौख्य, कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. स्वकर्तृत्व, स्वकष्टाने काही कामे पूर्णत्वास न्याल.
मीन
हा सप्ताह सर्वसामान्य असेल. जोडीदाराचे, कुटुंबीयांचे उत्तम सहकार्य लाभेल. त्यामुळे अडचणी, अडथळ्यांवर मात करताना परिवाराचे पाठबळ लाभेल. त्यांच्या सहकार्याने अडचणींवर यशस्वी मात कराल. काही धार्मिक, आध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. काही धार्मिक संस्थांना मदत, सहकार्य कराल. सप्ताहाच्या उत्तरार्धात भाग्याची उत्तम साथ मिळेल
सौ . कांचन थिटे
ज्योतिष, अंक वास्तू शास्त्र प्रवीण, विवाह (m.s), वास्तू तज्ञ
©2024. All Rights Reserved.