सातारा : शिंदे गटाच्या वतीने बीकेसी मैदानावर उद्या सायंकाळी पाच वाजता दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्याची तयारी सातारा जिल्ह्यातून पूर्ण झाली असून यासाठी 180 ट्रॅव्हल्स बस 640 सुमो,स्कॉर्पिओ यांसह चारचाकी गाड्या सज्ज करण्यात आल्या आहेत.. गरज पडल्यास 200 एसटी यासाठी घेण्यात येणार असून जिल्ह्यातून एकूण
15 हजार लोक जाणार आहेत..त्यांच्यासाठी
जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली असून उद्या सकाळी10 नंतर वाहने मुंबईच्या दिशेने रवाना केली जाणार आहेत.. या मेळाव्याला अंदाजे 2 लाख लोक जमतील असा अंदाज उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे यांनी व्यक्त करत मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक मुंबईत दाखल होणार असल्याने मुंबई पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यासाठी मुंबई पोलीस मेळाव्यासाठी कार्यक्षम असल्याचे सांगितले आहे..
©2026. All Rights Reserved.