वाठार स्टेशन : सध्या मोठ्या प्रमाणावर बेंगलोर मुंबई औद्योगिक वसाहतीचा प्रश्न पेटताना दिसून येत आहे याच माध्यमातून काही दिवसांपूर्वी माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरती घणाघाती अशी टीका केली होती त्याचप्रमाणे या टीकेचे प्रत्युत्तर म्हणून श्रीमंत रामराजे युवा प्रतिष्ठान तर्फे आज वाठार स्टेशन येथे आमदार जयकुमार गोरे यांचा पुतळा वाग्देव चौकात जाळण्यात आला. आता मात्र हा औद्योगिक वसाहतीचा प्रश्न चांगलाच पेटताना दिसून येत असून याची ठिणगी उत्तर कोरेगाव तालुक्यातून पडल्याची दिसून येत आहे
©2026. All Rights Reserved.