ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
महाबळेश्वर अर्बन बॅंकेवर प्रशासक नेमण्याची संचालकांची मागणी
  • Satara News Team
  • Thu 1st Sep 2022 08:14 am

महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर अर्बन बॅंकेत प्रशासकाही नियुक्ती करण्याची मागणी बँकेचे संचालक समीर सुतार यांनी सहा.दुय्यम निबंधक जे.पी शिंदे यांना निवेदनाद्वारे केली. यावेळी जेष्ठ संचालक युसूफ शेख, संगीत तोडकर, दिलीप रिंगे, वृषाली डोईफोडे उपस्थित होत्या. महाबळेश्वर अर्बन बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या निवडी आधी सर्व संचालकांची बंद दाराआड चर्चा फिस्कटली व संचालकांमध्ये मतभेद झाल्याने निवडीवेळी संचालक समिर सुतार यांच्यासह जेष्ठ संचालक युसूफ शेख, संगीता तोडकर, वृषाली डोईफोडे, दिलीप रिंगे हे अनुपस्थित राहिले. या बहिष्कारामुळे 13 संचालकांपैकी 8 संचालकांच्या उपस्थितीत ही निवडीची प्रक्रिया पार पडली.या निवडीवेळी अनुपस्थित राहिलेल्या पाच संचालकांच्या गटाने सहा. दुय्यम निबंधकांना भेटून निवेदन दिले असून या निवेदनात बँकेतील पदाधिकारी निवड रद्द करून प्रशासकाची नियुक्ती करण्याची प्रामुख्याने मागणी केली आहे. तसेच बँकेच माजी अध्यक्षांचा निष्क्रिय कारभारामुळेच आम्ही संचालकांनी त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले तसेच सर्वांनी एकत्रित येऊन बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करून थकबाकीची प्रमाण कमी करण्यासाठीचे महत्वपूर्ण काम करणे गरजेचे होते. मात्र बँकेच्या सभासदांनी ज्या विश्वासाने संचालकांना विश्वस्त म्हणून पाठवले आहे त्यांनाच धोका देऊन नूतन अध्यक्षांसह काही संचालकांनी नातेवाईक मित्रमंडळींच्या नावावर घेतलेल्या भरमसाट कर्जाची परतफेड करायची नाही, हेच धोरण या संचालकांचे असून यांनीच बँकेस आर्थिक अडचणीत आणले आहे. बँकेतच गटतट निर्माण करून राजकारण करण्याचा प्रयन्त सुरु केले असून असे गट निर्माण करून या गटांच्या माध्यमातून आपला स्वार्थ व उन्नती साधत आहेत. अश्या प्रकारचे वर्तन चालू असल्याने संस्थेच्या व भागधारक, ठेवीदारांच्या हिताचे नसल्याने अश्या संचालकांवर कारवाई करावी व बँकेवर प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केलीयावेळी अर्बन बँकेचे संचालक समीर सुतार यांनी महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी असलेल्या बँकेत कधीही, कोणत्याही प्रकारचे राजकारण झाले नाही, गटातटाचे राजकारण न करता संस्था प्रगतिप्रथावर जावी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो मात्र आता या परंपरेला छेद देण्याचे काम नूतन अध्यक्षांसह काही संचालकांकडून होत असून या निवडीला आमचा विरोध असल्याचे नमूद केले. यावेळी जेष्ठ संचालक युसूफ शेख, संगीता तोडकर, वृषाली डोईफोडे, दिलीप रिंगे उपस्थित होते. या पाच संचालकांनी दिलेल्या तक्रारीला दुय्यम निबंधक काय निर्णय घेतात याकडे महाबळेश्वर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.



©2026. All Rights Reserved.