ताज्या बातम्या
आधे इधर जाओ...आधे उधर चलो..... || म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो...! . || कृष्णेच्या रणांगणातून बाबांनी काढला पळ. || कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...!. || कराड चावडीवर एकास हग्यामार . || चंदेरीसोनेरी झगमगाट... कराड पोलिसांच्या चावडीवर चर्चांचा घमघमाट. || कृष्णा-कोयना पतसंस्थेसह कराड अर्बन बँक चौकशीच्या फेऱ्यात . || कराड तहसिलदारांच्या आदेशला केराची टोपली. || अबब... लाल मातीचा एक प्रस्ताव खर्ची तब्बल 67 हजार. || कराड आरटीओच्या रेटकार्डची चर्चा जोमात . ||  कराड ‘आरटीओ‘ची तऱ्हा  न्यारी. || कोयना - कृष्णेच्या काठाला जेसीबी पोकलॅन्डचा बोलबाला. || जिल्हाधिकारी साहेब...! कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा. || कृष्णा कारखान्यावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. || घर तिथे संविधान. || कासारशिरंबेतील पुलाच्या उभारणीमुळे दळणवळणाला मिळणार चालना : डॉ. अतुल भोसले. || साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा . || अजय कुमार मिश्रा यांची विकसित भारत संकल्प यात्रा*. || कराड उत्तर मंडलात भाजपच्या निवडी जाहीर......!. || अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा. || बकरीद ईदची सामुदायिक नमाज रद्द. || प्रियांका प्ले हाऊस बंद होणार. || प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम. || प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ. || बेमुदत आंदोलनास पोलीस छावणीचे स्वरूप. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा. || कोयना गृहनिर्माणच्या सदस्यांचे बेमुदत धरणे आंदोलन. || सातारा पालिकेत मुकादमांच्या बोगस सह्यांचा गोलमाल. || गृहनिर्माण सोसायटी फक्त निवासी वापरासाठीच . || कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली. || कोयना गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन संचालकात वादावादी ?. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा. || कृष्णा - कोयनेचा नदीकाठ उध्वस्त. || गौणखनिज माफिया व लोकप्रतिनिधींची भागीदारी. || करा कष्ट ...व्हा भष्ट तरच दिसेल.. सगळं स्पष्ट. || कैसा चलेगा..... बाबा - साहेब...!. || मानकुमरे म्हणतात... त्याला मस्ती आलीय- त्याला सटकून मारला पाहिजे. || कराड बाजार समितीसह उपसमित्यांचाही विकास करू : आ.बाळासाहेब पाटील. || सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा. || आशा शिंदे यांचे निधन. || कराड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सोयीची भूमिका. || भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेस कोलदांडा. || लग्न मिरवणुकीत हवेत गोळीबार. || नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला. || कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत. || कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू. || संभाजीराजे कीर्तिवंत, शूर राजे : धैर्यशील विजयसिंह पाटील  . || राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये. || जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता. || प्लास्टर ऑफ पॅरिसच्या  (पी.ओ.पी.) मूर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई. ||
ढोणे कॉलनीत हवेत फायरिंग ... दोन गटात दांडियावेळी वादावादी
  • प्रकाश शिंदे
  • Wed 5th Oct 2022 01:06 pm

सातारा : साताऱ्यात दांडिया संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात युवकांची झुंबड मैदानाबाहेर पडली. यावेळी गाडी काढताना दुचाकीचे चाक पायावरून गेल्याने दोन गटात शाब्दिक चकमक उडाली. सातारा शहरात मंगळवारी रात्री दोन गटात वाहन मागे घेण्यावरून दांडियावेळी वादावादी झाली. यानंतर त्याचे पर्यवसन थेट फायरिंगमध्ये झाले. या घटनेने शहरात खळबळ उडाली. फायर करणारे पसार झाले असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील एका शाळेजवळ मंगळवारी रात्री दांडिया खेळताना युवकांच्या दोन गटात वादावादी झाली. यामुळे महिला, युवतींमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन तणाव वाढला. या घटनेनंतर दोन्ही गट पांगले. मात्र या घटनेतून मध्यरात्री पुन्हा थरकाप उडाला. काही संशयितांनी ढोणे कॉलनीत हवेत फायरिंग केले. यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र यामुळे परिसर हादरून गेला.

शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना जिवंत राऊंड व पुंगळ्या सापडल्या असून, त्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरू होती. संशयित सातारा शहर परिसरातील असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दुचाकी पायावर घातल्याने आमिर शेख या संशयितांने फायरिंग केलं असल्याचं सांगण्यात येत असून तो फरार असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसानी एक जणाला ताब्यात घेतल्याचे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी सांगितले आहे.



©2024. All Rights Reserved.