ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
रामराजे म्हणजे मांडूळाची औलाद : आमदार जयकुमार गोरे यांची विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर घनाघाती टीका
  • मुकुंदराज काकडे
  • Sat 1st Oct 2022 06:44 am

कोरेगाव  : सध्या सातारा जिल्ह्यात मुंबई - बेंगलोर औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर पेटताना दिसून येत आहे माढा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच माण खटावचे आमदार जयकुमार गोरे हे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. काल आयोजित केलेल्या एमआयडीसी विरोधी संघर्ष समितीच्या कार्यक्रमादरम्यान माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचा चांगलाच बोचऱ्या शब्दात समाचार घेतला खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आपल्या भाषणात म्हणाले की, रामराजेंनी एजंट घालून येथे जागा खरेदी करण्याचे काम सुरू केले आहे त्याचप्रमाणे एजंट घातल्यामुळे रामराजेंचे दौरे इकडे सध्या वाढू लागले आहेत मात्र फलटण तालुक्यात एवढे फिरत नाहीत एवढे इकडे फिरायला लागलेत तसेच १२०० एकर जमीन घेण्याकरीता रामराजेंनी १२०० कुटुंबाचं वाटोळ करण्याचा प्लॅन आखला आहे. अन जशी गुरं मोकळ्या रानात हुदाडत्यात तशी यांना मोकळी वाट झाली आहे हुदडायला खासदार पुढे म्हणाले रामराजेंना ज्या उत्तर कोरेगाव तालुक्याने निवडून दिले आहे त्याच उत्तर कोरेगाव तालुक्याने मलाही लोकनियुक्त खासदार केले आहे त्यामुळे माझ्याकडे येतील तेव्हा मी लोकांसाठी उभा राहीन व उभा राहिल्यानंतर यांना माघार घेतल्याशिवाय पर्याय उरणार नाही अशा परखड शब्दात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोळशी येथील कार्यक्रमात थेट रामराजेंवर बोचऱ्या शब्दात टीका केली. त्याचप्रमाणे माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी भाषण सुरू होतात आपल्या भाषणाचे टार्गेट रामराजे असल्याचे दर्शवत टीकेला सुरुवात केली ते म्हणाले म्हसवड मध्ये ही अशीच एक संघर्ष समिती स्थापन केली आणि तिथे काय सांगतो की MIDC गेली नाही पाहिजे आणि इथे येऊन सांगतो म्हसवडची MIDC मी इथे आणतो तुम्हाला विकास हवाय का म्हणजे ही मांडूळाची अवलाद आहे सकाळी इथे येऊन सांगतो या भागाचा विकास झाला पाहिजे आणि तिकडे सांगतो MIDC चालली आहे आंदोलन करा आणि वाद वाढवायचे भांडणे लावायची आणि साम्राज्य वाढवायचे गावागावात भांडे लावायची भावा भावात भांडणे लावायची जाती जातीत भांडणे लावायची आणि भांडणे लावून स्वतःची पोळी भाजायची आजपर्यंत त्याचे काम त्याच्या पलीकडे काय नाही गेली वीस वर्षे झाली या भागातली लोक पाणी मागत आहेत व आपण वीस वर्षे या खात्याचे मंत्री होता यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवलं नाही आणि एमआयडीसी केल्यानंतर काय विकास होणार असल्या तिखट शब्दात आमदार जयकुमार गोरे यांनी रामराजेंवर निशाणा साधला. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर उत्तर कोरेगाव तालुक्यामधील जनसमुदाय जमला होता आता मात्र MIDC प्रश्न चांगल्या प्रकारे पेटताना दिसून येत आहे या टीकेनंतर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक यांची भूमिका काय असेल हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.



©2026. All Rights Reserved.