सातारा : साताऱ्यात सुरु असलेल्या कास महोत्सवाला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी भेट दिली, दरम्यान यावेळी साताऱ्यात बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या मराठी शाळांवरून व्यासपीठावर राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी शैक्षणिक धोरणांवरून शिक्षण मंत्री केसरकर कान पिरगळल्याचे दिसून आले. तसेच यावेळी त्यांनी आमदार शिवेंद्रराजेंवर देखील चांगलेच तोंडसुख घेतले.
विद्यार्थ्यांना शालेय जीवनात चांगले संस्कार, पठन व चांगले शिक्षण मिळाले तरच देशाचे भवितव्य उज्वल होऊ शकते, आणि यासाठी हवे असलेले बदल आपण करू शकता, असा विश्वास कल्पनाराजेंनी केसरकरांजवळ व्यक्त केला. परंतु हि कामगिरी सोपी नाही, मंत्री होणं सोपं नसत परंतु मंत्री झाल्यानंतर धोरणांमध्ये योग्य बदल केल्यास राज्यासह देश नक्कीच चांगल्या पातळीवर जाईल असे सांगतानाच त्यांनी शिवेंद्रराजेंवर हि चांगलेच तोंडसुख घेतले.
आ. शिवेंद्रराजेंनी कास महोत्सवाला विरोध दर्शविताना पंकज चव्हाणला टार्गेट करत उदयनराजेंच्या बगलबच्चांसाठी हा महोत्सव असल्याचे त्यांनी म्हटले होते, याला प्रत्त्युत्तर देताना राजमाता कल्पनाराजेंनी शिवेंद्रराजेंना टार्गेट करत शालेय पोषण आहारावरून थेट शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. जे उदयनराजेंच्या कार्यकर्त्यांना बगलबच्चे म्हणतात त्यांचे बगलबच्चे शालेय पोषण आहारात करोडोंचा घोटाळा करतात,असे म्हणत शिवेंद्रराजेंचे निकटवर्ती फिरोज पठाण यांच्यावर निशाणा साधला, हे घोटाळे देखील मंत्री महोदयायांना सांगितले असून त्यावर कारवाई करावी असे कल्पनाराजे म्हणाल्या.
©2026. All Rights Reserved.