खटाव : वर्धनगड ता. खटाव येथील सर्व सामान्य कुटुंब असलेले रेहाना आयुब शिकलगार यांचे राहते घर पडून गेली दहा ते पंधरा वर्षे झाली, त्या पडलेल्या घराचा तलाठी यांनी पंचनामा केला होता. परंतु त्यापासून त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. आजही त्या पडक्या घराच्या एका खोaलीमध्ये आयुब शिकलगार त्याची पत्नी रेहाना शिकलगार व मुलगा वाजिद शिकलगार हे राहत आहेत. शासनाकडून घरकुल मिळण्यासाठी त्यांनी अनेकदा मागणी केली, 2017 ला घरकुलचा सर्वे झाला त्यामध्ये रेहाना आयुब शिकलगार यांचे नाव आले, परंतु घरकुलची मागणी आजतागायत पूर्ण झाली नाही. गेल्या वर्षीची घरकुल यादी आली. त्यामध्ये 40 व्या नंबरला नाव आले आहे.काहींची घरे त्यामध्ये पूर्ण झाली. परंतु आजही अशा पडत्या पावसामध्ये संपूर्ण घर आतूनही भिजत असलेल्या घरामध्ये हे कुटुंब राहत आहे, ना शेती ना उत्पन्नाचे साधन त्यामुळे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असताना स्वतःचे घर स्वतःच्या पैशाने बांधण्यासाठी पैसे आणणार कोठून असा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे असताना देखील अशा कुटुंबास आजतागायत घरकुल मिळाले नाही, ही मोठी शोकांतिका आहे. रेहाना मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. तिचे पती आयुब याची दोन मोठी ऑपरेशन झाल्याने जड कामे करू शकत नाही,तसेच त्यांचा मुलगा वाजिद शालेय शिक्षण घेत असल्याने, शिक्षणासाठीही खर्च येत आहे. दोघांच्या येणाऱ्या मोल मजुरी कामाचा पैशातून पूर्ण उदरनिर्वाह होत नाही. त्यातच मुलाच्या शिक्षणाचा खर्च झेपत नाही,तर मग पडलेले घर बांधणार कसे! असाही प्रश्न त्यांच्यापुढे उपस्थित होत आहे. परवा सातारा जिल्ह्याचे मुख्याधिकारी विजय गौडा यांचा खटाव तालुक्यातील गावोगावांची विकास कामांची पाहणी दौरा होता, त्यादरम्यान वर्धनगड येथे मुख्याधिकारी विनय गौडा व खटाव चे गटविकास अधिकारी यांचे समक्ष त्यांनी आपल्या घरकुल संबंधी माहिती दिली व घरकुल मिळण्यासंबंधी कळकळीची विनंती केली त्यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्य, पत्रकार, ग्रामस्थ उपस्थित होते. गेल्या पंधरा दिवसांमध्ये सातारा जिल्ह्यातील सर्वच परिसरामध्ये पावसाने आहाकार माजवला असून अशा परिस्थितीमध्ये या त्यांच्या पडक्या राहत्या घरातून पाणी वगळून जाते, संपूर्ण घर ओले आहे. अशी अवस्था त्यांच्या राहत्या घराची आजही आहे. आणि अशातच त्यांचा संसार चालू आहे. तरी प्रशासनाने या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून रेहाना आयुब शिकलगार यांना तातडीने मंजूर असलेल्या घरकुलासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देऊन यांचे घरकुल मार्गी लावावे ही विनंती शिकलगार यांच्याकडून करण्यात येत आहे
©2026. All Rights Reserved.