पुसेगाव - कोरेगाव पोलीस ठाण्यात बेवारस रित्या व न्यायालयीन निकाल लागलेल्या गुन्ह्यातील सोन्याचा मुद्देमाल तसेच एकूण ३३ दुचाकी व ४ चार चाकी वाहने असून या वाहनांबाबत मालकी हक्क असणाऱ्या व्यक्तींनी दिनांक ३० नोव्हेंबरपर्यंत कोरेगाव पोलीस ठाणेत येवून वाहने पाहुन खात्री करावी व खात्री झाले नंतर कागदपत्रे सादर करावीत व वाहन घेऊन जावे अन्यथा त्याचा कायदेशीर लिलाव केला जाणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी दिली.
कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ३३ दुचाकी व ४ चार चाकी वाहनेही बेवारस स्थितीत मिळून आलेकी आहेत, ही सर्व वाहने व न्यायालयीन निकाल लागलेल्या सोन्याच्या गुन्ह्यातील मुद्देमाल शासन नियमाप्रमाणे लिलाव करण्यात येणार आहे. या वाहनांबाबत अद्याप कोणीही मालकी हक्क सिद्ध केलेला नाही. कोरेगाव शहर व परिसरातील नागरिकांना याद्वारे आव्हान करण्यात येते की, ज्यांची ही वाहने असतील त्यांनी मूळ कागदपत्रांसह हजर राहून खात्री करून आपले वाहन दिनांक ३० नोव्हेंबर २०२२ पूर्वी घेऊन जावीत. जी वाहने घेऊन जाणार नाहीत, त्यांचा कायदेशीररित्या लिलाव करण्यात येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.
©2026. All Rights Reserved.