कोरेगाव : बनवडी (इब्राहिमपूर) तालुका कोरेगाव येथे राहणाऱ्या पारधी समाजावर दुधनवाढीतील काही समाजकंटकांनी हल्ला करून बेदम मारहाण केली. व जीवना आवश्यक वस्तूंची नासधूस करून असणाऱ्या घराची तोडफोड करून पारधी समाजावर अन्याय केला असल्याची तक्रार पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश केंद्रे यांच्याकडे केली असून सदर या घटनेची नोंद वाठार पोलीस स्टेशन येथे करण्यात आलेली आहे..
, वाठार पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार व पारधी समाजाची महिला . निर्मला विनोद भोसले वय 45 वर्ष, यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, मोटार सायकलच्या अपघाताच्या कारणावरून, नावे पूर्ण माहित नसल्याने,दुधनवाडीतील काही समाजकंटक व गाव गुंडांनी बनवडी,इब्राहिम फाटा तालुका कोरेगाव येथे आम्ही राहात असून, येथे रहात असणाऱ्या माझ्यासह पारधी समाजावर दहा ते पंधरा जणांनी हल्ला करून येथील महिला व मुलांना जबर मारहाण केली, तसेच समाज उपयोगी साहित्याची मोडतोड धान्यधुन्याची व घराची नासाडी व मोडतोड करून वित्तीय हानी केली आहे, सदर या घटनेची नोंद वाठार पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून, सदर दुधनवाडी येथील या समाजकंटकावर कारवाई करून, पारधी समाजाच्या महिला, मुलावर, लोकांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात दुधनवाडीतील या समाजकंटकावर पोलीस ठाणे वाठार येथे तक्रार करण्यात आलेली आहे. सदर या पारधी समाजास न्याय मिळावा यासाठी दलित पॅंथरचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विश्वास मोरे यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी कोरेगाव गणेश केंद्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे याबाबत मागणी केली आहे.
©2025. All Rights Reserved.