ताज्या बातम्या
आधे इधर जाओ...आधे उधर चलो..... || म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो...! . || कृष्णेच्या रणांगणातून बाबांनी काढला पळ. || कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...!. || कराड चावडीवर एकास हग्यामार . || चंदेरीसोनेरी झगमगाट... कराड पोलिसांच्या चावडीवर चर्चांचा घमघमाट. || कृष्णा-कोयना पतसंस्थेसह कराड अर्बन बँक चौकशीच्या फेऱ्यात . || कराड तहसिलदारांच्या आदेशला केराची टोपली. || अबब... लाल मातीचा एक प्रस्ताव खर्ची तब्बल 67 हजार. || कराड आरटीओच्या रेटकार्डची चर्चा जोमात . ||  कराड ‘आरटीओ‘ची तऱ्हा  न्यारी. || कोयना - कृष्णेच्या काठाला जेसीबी पोकलॅन्डचा बोलबाला. || जिल्हाधिकारी साहेब...! कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा. || कृष्णा कारखान्यावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. || घर तिथे संविधान. || कासारशिरंबेतील पुलाच्या उभारणीमुळे दळणवळणाला मिळणार चालना : डॉ. अतुल भोसले. || साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा . || अजय कुमार मिश्रा यांची विकसित भारत संकल्प यात्रा*. || कराड उत्तर मंडलात भाजपच्या निवडी जाहीर......!. || अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा. || बकरीद ईदची सामुदायिक नमाज रद्द. || प्रियांका प्ले हाऊस बंद होणार. || प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम. || प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ. || बेमुदत आंदोलनास पोलीस छावणीचे स्वरूप. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा. || कोयना गृहनिर्माणच्या सदस्यांचे बेमुदत धरणे आंदोलन. || सातारा पालिकेत मुकादमांच्या बोगस सह्यांचा गोलमाल. || गृहनिर्माण सोसायटी फक्त निवासी वापरासाठीच . || कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली. || कोयना गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन संचालकात वादावादी ?. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा. || कृष्णा - कोयनेचा नदीकाठ उध्वस्त. || गौणखनिज माफिया व लोकप्रतिनिधींची भागीदारी. || करा कष्ट ...व्हा भष्ट तरच दिसेल.. सगळं स्पष्ट. || कैसा चलेगा..... बाबा - साहेब...!. || मानकुमरे म्हणतात... त्याला मस्ती आलीय- त्याला सटकून मारला पाहिजे. || कराड बाजार समितीसह उपसमित्यांचाही विकास करू : आ.बाळासाहेब पाटील. || सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा. || आशा शिंदे यांचे निधन. || कराड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सोयीची भूमिका. || भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेस कोलदांडा. || लग्न मिरवणुकीत हवेत गोळीबार. || नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला. || कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत. || कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू. || संभाजीराजे कीर्तिवंत, शूर राजे : धैर्यशील विजयसिंह पाटील  . || राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये. || जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता. || प्लास्टर ऑफ पॅरिसच्या  (पी.ओ.पी.) मूर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई. ||
जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे शानदार उद्घाटन
  • Aavaj Daily Team
  • Wed 18th Jan 2023 06:34 am

सातारा : बालगृहातील  प्रवेशितांसाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सावाचा उपक्रम स्तुत्य आहे. या बाल महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये जी मुले-मुली यशस्वी होतील अशांना पुढे जाण्यासाठी योग्य प्रशिक्षकांसह सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले.

जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे शानदार उद्घाटन


सातारा : बालगृहातील  प्रवेशितांसाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सावाचा उपक्रम स्तुत्य आहे. या बाल महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये जी मुले-मुली यशस्वी होतील अशांना पुढे जाण्यासाठी योग्य प्रशिक्षकांसह सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले.


 बालगृहातील प्रवेशितांसाठी 17 ते 19 जानेवारी 2023 या कालावधीत श्रीमंत छत्रपती शाहु जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे  याचे क्रीडा ज्योत पेटवून पोलीस अधीक्षक श्री. शेख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास तहसिलदार राजेश जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, महिला व बाल विकास कार्यालयातील आतिष शिंदे, चेतन भारती, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष सुचित्रा घोगरे-काटकर, बाल न्याय मंडळाच्या स्मिता जामदार यांच्यासह सदस्य व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.


चाचा नेहरु बाल महोत्सावामुळे बालगृहातील प्रवेशितांच्या सुप्त गुणांना वाव मिळणार आहे, असे सांगून पोलीस अधीक्षक श्री. शेख म्हणाले, या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या मुला-मुलींना चांगले प्रशिक्षक, मैदान किंवा ज्या शाळेंमध्ये खेळांना वाव दिला जातो त्या शाळेत अशा मुला-मुलींचा प्रवेश करण्यात यावा.


बालगृहातील प्रवेशितांच्या विविध ठिकाणी सहली काढव्यात. चाचा नेहरु बाल महोत्सावात सर्व सेायी-सुविधा देण्यात आल्या आहेत. मुला-मुलींनी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांवर लक्ष केंद्रीत करुन  स्पर्धांमध्ये १०० टक्के योगदान देवून या स्पर्धांचा आनंद घ्यावा, असेही पोलीस अधीक्षक श्री. शेख यांनी यावेळी सांगितले.


श्रीमंत छत्रपती शाहु जिल्हा क्रीडा संकुलामधून अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू तयार झाले आहेत. चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नाईक यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच बालगृहातील प्रवेशित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बालगृहातील प्रवेशितांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवामध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, १००, २०० व ४०० मीटर धावणे, रिले, गोळाफेक, थाळी फेक, लिंबू चमचा यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.



©2024. All Rights Reserved.