सुषमा अंधारे म्हणाल्या की, "आम्ही हरलो म्हणजे तुम्ही जिंकलात असं होत नाही डाव तुमच्या हातात असला तरी, जिंकता तुम्हाला येत नाही. मोदी-शहा जी फडणवीसजी तुम्ही जिंकलात? अभिनंदन! पण तुम्ही जिंकू शकला कारण आमच्यातल्याच फितुरांनी साथ दिली; अन्यथा तुमच्यात ती धमक नक्कीच नव्हती. पण आम्ही खडकातूनही पुन्हा उगवू, असंही अंधारे यांनी म्हटलं.
महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह (shivsena symbol) गोठवलं आहे. यामुळे शिंदे आणि ठाकरे गटाला मोठा फटका बसला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह (shivsena symbol)वापरता येणार नाही. तसेच शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. त्यामुळे आता नव्या चिन्हासाठी सोमवारी दुपारी एक वाजेपर्यंत दोन्ही गटाला निवडणूक आयोगाला पर्याय द्यावे लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन (shivsena symbol) सुनावणी सुरु होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. यानंतर शिंदे गटाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडे लवकरात लवकर याबाबतचा निकाल मार्गी लावावा, अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते.केवळ अंधेरी पोटनिवडणुकीकरता हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
©2026. All Rights Reserved.