ताज्या बातम्या
आधे इधर जाओ...आधे उधर चलो..... || म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो...! . || कृष्णेच्या रणांगणातून बाबांनी काढला पळ. || कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...!. || कराड चावडीवर एकास हग्यामार . || चंदेरीसोनेरी झगमगाट... कराड पोलिसांच्या चावडीवर चर्चांचा घमघमाट. || कृष्णा-कोयना पतसंस्थेसह कराड अर्बन बँक चौकशीच्या फेऱ्यात . || कराड तहसिलदारांच्या आदेशला केराची टोपली. || अबब... लाल मातीचा एक प्रस्ताव खर्ची तब्बल 67 हजार. || कराड आरटीओच्या रेटकार्डची चर्चा जोमात . ||  कराड ‘आरटीओ‘ची तऱ्हा  न्यारी. || कोयना - कृष्णेच्या काठाला जेसीबी पोकलॅन्डचा बोलबाला. || जिल्हाधिकारी साहेब...! कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा. || कृष्णा कारखान्यावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. || घर तिथे संविधान. || कासारशिरंबेतील पुलाच्या उभारणीमुळे दळणवळणाला मिळणार चालना : डॉ. अतुल भोसले. || साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा . || अजय कुमार मिश्रा यांची विकसित भारत संकल्प यात्रा*. || कराड उत्तर मंडलात भाजपच्या निवडी जाहीर......!. || अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा. || बकरीद ईदची सामुदायिक नमाज रद्द. || प्रियांका प्ले हाऊस बंद होणार. || प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम. || प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ. || बेमुदत आंदोलनास पोलीस छावणीचे स्वरूप. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा. || कोयना गृहनिर्माणच्या सदस्यांचे बेमुदत धरणे आंदोलन. || सातारा पालिकेत मुकादमांच्या बोगस सह्यांचा गोलमाल. || गृहनिर्माण सोसायटी फक्त निवासी वापरासाठीच . || कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली. || कोयना गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन संचालकात वादावादी ?. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा. || कृष्णा - कोयनेचा नदीकाठ उध्वस्त. || गौणखनिज माफिया व लोकप्रतिनिधींची भागीदारी. || करा कष्ट ...व्हा भष्ट तरच दिसेल.. सगळं स्पष्ट. || कैसा चलेगा..... बाबा - साहेब...!. || मानकुमरे म्हणतात... त्याला मस्ती आलीय- त्याला सटकून मारला पाहिजे. || कराड बाजार समितीसह उपसमित्यांचाही विकास करू : आ.बाळासाहेब पाटील. || सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा. || आशा शिंदे यांचे निधन. || कराड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सोयीची भूमिका. || भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेस कोलदांडा. || लग्न मिरवणुकीत हवेत गोळीबार. || नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला. || कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत. || कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू. || संभाजीराजे कीर्तिवंत, शूर राजे : धैर्यशील विजयसिंह पाटील  . || राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये. || जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता. || प्लास्टर ऑफ पॅरिसच्या  (पी.ओ.पी.) मूर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई. ||
कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...!
  • Aavaj Daily Team
  • Sun 20th Oct 2024 05:13 pm

कराड चावडीवरील सोनेरीचंदेरी झगमगाट संपूर्ण राज्याने पाहिला. हा झगमगाट सर्वदूर पसरला. चावडीचा कारभार चव्हाट्यावर आला. प्रमुखांनी वरिष्ठ दूत पाठवून सलग दोन-तीन दिवस तपास केला आणि झगमगाटाच्या चर्चेत सत्यता आढळल्याने अखेर चावडी प्रमुखास जाणवस घरी बोलावले. या घटनेचा वस्तुनिष्ठ घेतलेला कानोसा जशाचा तसा...


कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...

 खुर्ची एक कारभारी दोन; एकाची रिंगणात रंगला खेळ

 पराग शेणोलकर

कराड.

 सोनेरीचंदेरी झगमगाटाच्‍या चर्चेचा कानोसा घेत कराडच्‍या चावडीप्रमुखाला वरिष्‍ठांनी जाणवस घराची राखण करण्‍याच्‍या सुचना केल्‍या होत्‍या. या सुचनांची गुंडाळी करणारा कागद कराडच्‍या चावडीप्रमुखाने वरतून आणला आणि त्‍यानंतर एक खुर्ची अन दोन कारभारी असा खेळ त्‍याठिकाणी सुरु झालाय. या प्रकरणात मैतराच्‍या हाकेला धावून जात अदृष्‍य हातांनी मदत केल्‍याच्‍या संशयावरुन जाणवस घरातील एका प्रमुख शाखेच्‍या प्रमुख कारभाऱ्याला देखील वरिष्‍ठांनी रिंगणात फिरायला लावल्‍याची चर्चा आहे. 


करवीनिवासीचा आर्शिवाद घेवून मुंबापुरीच्‍या दिशेने निघालेल्‍या एका आलिशान बसमधील पांढऱ्या खोक्‍यांची माहिती मिळाल्‍याने कराडातील वर्दीवाल्‍यांनी शिताफिने, सापळा रचत, मिळालेल्‍या गोपनीय माहितीची पडताळणी केली. पांढऱ्या रंगाच्‍या खोक्‍यांची बस थांबवून घेत प्रवाशांना जागेवर सोडून ती चावडीत आणण्‍यात आली. तीन दिवस कसून आणि कानस घासून चंदेरीसोनेरीचा तपास सुरु होता. मोजणी झाली. चिटोरीतील नोंदीपेक्षा जास्‍त वजन असल्‍याचे समजल्‍यानंतर झाकापाकीची चर्चा सुरु झाली. अपेक्षेप्रमाणे झाकापाकी झाल्‍यानंतर 'तुझ्‍या गळ्या...माझ्‍या गळा...गुंफू मोत्‍यांच्‍या माळा', या ओळी आळवत चावडीतील प्रमुखांनी स्‍वत:सह इतरांच्‍या तोंडावर हात फिरवत अलाबला करत आळीमिळी गुप चिळीचे हुमाण घातले. 

आळी...मिळी...गुप चिळीच्‍या या हुमाणानंतरही चंदेरीसोनेरी झगमगाटाची कुजबुज बाहेर पडली. कुजबुजीचा कानोसा घेतल्‍यानंतर भोपळ्यात बसलेल्‍या म्‍हातारीच्‍या गोष्‍टीची आठवण अनेकांना झाली. यानंतर कानोसा घेणाऱ्यांनी त्‍याचा डांगोरा पिटला. अन् चंदेरीसोनेरी चर्चा आणि झगमगाटाचा वेध वरिष्‍ठांनी कराडच्‍या चावडीवर ठिय्या ठोकला. खालूनवर वरून खाली चौकशीच्या फैरी झाडल्या. तीन दिस काथ्याकुठ झाला खुलासे मागितले. अन् मग काय चावडी प्रमुखाची पुरती तंतरली. काय करायचं असं म्हणतं डोकं खांजळण्याची वेळ आली. दोन तीन रात बसून लखोटा तयार केला आणि काळरात्रीला रथातून वरिष्ठांकडे दूत धाडला. मात्र त्याचा काय फायदा झाला नाही. वरिष्ठांनी थेट चावडीप्रमुखाला जाणवस घराच्‍या राखणीसाठी बोलावले. 

चावडी प्रमुखाला हे आवाहन काय पटलं नाय. आजारपणात जात कराडचा चावडीप्रमुख थेट वरती गेला. त्‍याठिकाणाहुन एक खलिता आणत त्‍याने थेट चावडी गाठली. कराडच्या चावडीवर नव्या प्रमुखांनी खुर्ची धरून ठेवली. तिथल्‍या कारभाऱ्याला उठवत सुत्रे ताब्‍यात घेण्‍याची प्रक्रिया सुरु केली. या प्रक्रियेमुळे काही काळ चावडीत गोंधळ उडाला. 


रेड्यांच्‍या टकरीत आपली कातडी सोलटाय नको म्‍हणून चावडीतील अनेकांनी खुष्‍कीचा मार्गाने पळ काढला. या गोंधळाची माहिती प्रभारीने जाणवस घराच्‍या प्रमुखास दिली, मात्र त्‍याने त्‍यास मान्‍यता दिली नाही. सध्‍या या चावडीत एक खुर्ची अन दोन कारभारी अशी स्‍थिती निर्माण झाली आहे. 

आखले रिंगण.....?

जाणवस घराच्‍या राखणीला बोलावलेलेल्‍या जाणवस घरातील प्रमुख शाखेच्‍या प्रमुखाने अदृष्‍य मदत केल्‍याचे वरिष्‍ठांच्‍या कानावर आली. अन त्‍यांनी रिंगण आखून देत त्‍यात त्‍या प्रमुख शाखेच्‍या प्रमुखास चिपरी पाण्‍याचा खेळ खेळायला लावल्‍याची चर्चा सध्‍या वर्दीवाल्‍यांच्‍या गोटात आहे.



©2024. All Rights Reserved.