दहिवडी : रयत शिक्षण संस्थेत सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात. स्व.कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या अथक प्रयत्नातून ही संस्था नावारुपाला आली आहे.वटवृक्ष हे या संस्थेचे प्रतिक आहे. रोपट्याचे वटवृक्ष करण्याचे काम या दोघांनी केले.दीनदुबळे,कष्टकरी,अनाथ,सर्वसामान्यांच्या मुलांना स्वतःचे दागिने विकून शिकवले.वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून स्व.आण्णा व वहिनींनी जेवण दिले. परंतु सद्या आशिया खंडातील नावलौकीक असलेली रयत शिक्षण संस्था रयतेची राहिली नसल्याची चर्चा सर्वसामान्यांतून होत आहे. रयत'मधीलच नावाजलेल्या दहिवडी काॅलेजच्या प्राचार्यांनी पालकांना खालच्या पातळीवर केलेले संभाषण प्रकरण ताजे असतानाच दहिवडी काॅलेजच्या ग्रंथालयाजवळ असलेल्या उतारामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरच साचत आहे,परिणामी विद्यार्थ्यांना कॉलेजमध्येच ये-जा करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यावेळी काॅलेजच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांनादेखील विद्यार्थिनी वसतीगृहाच्या समोरील भिंतीवरून अथवा पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. अनेकांनी काॅलेजच्या प्राचार्यांना पत्रव्यवहार करुन काॅलेजमधील विवीध विषयांच्या सुधारणेबाबत मागणी केली होती.परंतु आजअखेर याबाबत काॅलेज प्रशासनाने कोणताही निर्णय न घेता त्या मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे. तरी या छोट्या छोट्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत,विद्यार्थ्यांच्या अडचणीबाबत स्वतःचीच टिमकी वाजवण्यात माहीर असलेल्या दहिवडी काॅलेज प्रशासनाला जाग येऊन विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत थांबणार का? याकडे विद्यार्थ्यांसह पालकवर्ग आणि नागरीकांचे लक्ष लागले आहे.
छायाचित्र : साठलेल्या पाण्यामुळे ये - जा करण्यासाठी विद्यार्थी पाण्याच्या बाजूने चालत कसरत करत जाताना... (छाया : एकनाथ वाघमोडे)
©2026. All Rights Reserved.