पाचगणी : पाचगणी नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण 2022 अभियाना अंतर्गत मार्च ते एप्रिल दरम्यान सर्वे झाला होता. या सर्वेनुसार पांचगणी शहराची संपूर्ण देशामध्ये एक लाख लोकसंख्येच्या आतील शहरामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे. याबरोबरच पाचगणी नगर परिषदेस वॉटर प्लस घोषित केले आहे. पाचगणी शहरास राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त होणे हे आपल्या सर्व शहरावासीयांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.
सदर पुरस्काराचा कार्यक्रम दिनांक १ ऑक्टोबर 2022 रोजी महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू, व केंद्रीय मंत्री हरदिप सिंग पुरी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वरती संपन्न झाला. सदरील पुरस्कार जिल्हाधिकारी श्री रुचेश जयवंशी, मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री गिरीश दापकेकर, माजी नगराध्यक्षा सौ लक्ष्मी कऱ्हाडकर , आरोग्य विभाग प्रमुख श्री सुरेश मडके, आरोग्य निरीक्षक श्री गणेश कासुर्डे, पाणीपुरवठा अभियंता श्री दिग्विजय गाढवे, शहर समन्वयक श्री ओंकार ढोले यांनी स्विकारला.

सदर पुरस्कार प्राप्त करण्यासाठी शहरातील सर्व नागरिकांचा तसेच नगर परिषदेच्या माजी पदाधिकारी, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे.
©2026. All Rights Reserved.