ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या २२ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड
  • Aavaj Daily Team
  • Sat 28th Jun 2025 12:54 pm

कराड/प्रतिनिधी : - 

येथील कृष्णा विश्व विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये बी.फार्मसीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या २२ विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे पुण्यातील नामांकीत कंपनीत निवड झाली आहे. या निवडीबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

याबद्दल अधिक माहिती देताना कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे अधिष्ठाता प्रा.डॉ. नामदेव जाधव म्हणाले, आमच्या संस्थेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच, शिक्षणानंतर उत्तम नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. नामांकीत कंपन्यांना आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी, संस्थेच्या ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट विभागाच्यावतीने नियमितपणे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन केले जाते. नुकतेच पुण्यातील सुप्रसिद्ध अजिओ फार्मास्युटिकल्सने घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये, संस्थेत बी.फार्मसीच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या २२ विद्यार्थ्यांची यशस्वी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे आणि संस्थेच्या ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट विभागाच्या समर्पित प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध झाल्याचे प्रा.डॉ. जाधव यांनी सांगितले. 

या यशाबद्दल कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, प्रमुख सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, डॉ. प्रवीण शिणगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा व कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या निवड प्रक्रियेसाठी ट्रेनिंग अ‍ॅन्ड प्लेसमेंट अधिकारी डॉ. ज्योतीराम सावळे यांच्यासह सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचाऱ्यांचे विशेष योगदान लाभले. 



©2026. All Rights Reserved.