सातारा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यांच्या समस्येवरून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी चांगलेच रान उठवलेय.. सातारा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वाढे फाटा या ठिकाणी पडलेले खड्डे वाहनधारकांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत.. रस्त्याला पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे शहरात जाणाऱ्या-येणाऱ्यांचे वाहन या खड्ड्यात जोरात आदळत असल्याने वाहनांचे नुकसान होऊन अनेक अपघात घडत आहेत.जिल्ह्या बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे स्वागत हे खड्ड्यांमध्ये आदळून होत आहे..नागरिक जीव मुठीत घेऊन गाड्या चालवत असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि NHAI च्या वादात हा खड्डा काही केल्या भरला जात नसल्याने वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.. संबंधित विभागाने हा धोकादायक खड्डा भरावा अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी सांगितले आहे..
©2026. All Rights Reserved.