महाबळेश्वर : महाबळेश्वर ट्रेकर संस्थेच्या वतीने ट्रेकर्स मंडळींच्या समस्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर व्यथा मांडण्यात आली. या वेळी महाबळेश्वर ट्रेकर्सला लागणारी मदतीची ही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना बोलावून त्यांना या सर्व समस्यांबाबत ची माहिती घेण्यास सांगितले असून महाबळेश्वर ट्रॅकर संस्थेला आपत्कालीन व्यवस्थापनाकडून तात्काळ साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत लेखी आदेश दिले. अहवाल तयार करून तो तात्काळ मला याचा पाठपुरावा तयार करून अहवाल सादर करण्यास सांगितले.
दरम्यान राज्यभरातील ट्रेकर्स मंडळींना मदत कार्यकाळात टोलमाफी देण्याच्या अनुषंगानेही प्रस्ताव सादर करण्याबाबत संबंधित अधिका-यांना आदेश देण्यात आले आहेत.
©2026. All Rights Reserved.