ताज्या बातम्या
कराडला जनजागृतीचा इव्हेंट . || आधे इधर जाओ...आधे उधर चलो..... || म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो...! . || कृष्णेच्या रणांगणातून बाबांनी काढला पळ. || कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...!. || कराड चावडीवर एकास हग्यामार . || चंदेरीसोनेरी झगमगाट... कराड पोलिसांच्या चावडीवर चर्चांचा घमघमाट. || कृष्णा-कोयना पतसंस्थेसह कराड अर्बन बँक चौकशीच्या फेऱ्यात . || कराड तहसिलदारांच्या आदेशला केराची टोपली. || अबब... लाल मातीचा एक प्रस्ताव खर्ची तब्बल 67 हजार. || कराड आरटीओच्या रेटकार्डची चर्चा जोमात . ||  कराड ‘आरटीओ‘ची तऱ्हा  न्यारी. || कोयना - कृष्णेच्या काठाला जेसीबी पोकलॅन्डचा बोलबाला. || जिल्हाधिकारी साहेब...! कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा. || कृष्णा कारखान्यावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. || घर तिथे संविधान. || कासारशिरंबेतील पुलाच्या उभारणीमुळे दळणवळणाला मिळणार चालना : डॉ. अतुल भोसले. || साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा . || अजय कुमार मिश्रा यांची विकसित भारत संकल्प यात्रा*. || कराड उत्तर मंडलात भाजपच्या निवडी जाहीर......!. || अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा. || बकरीद ईदची सामुदायिक नमाज रद्द. || प्रियांका प्ले हाऊस बंद होणार. || प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम. || प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ. || बेमुदत आंदोलनास पोलीस छावणीचे स्वरूप. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा. || कोयना गृहनिर्माणच्या सदस्यांचे बेमुदत धरणे आंदोलन. || सातारा पालिकेत मुकादमांच्या बोगस सह्यांचा गोलमाल. || गृहनिर्माण सोसायटी फक्त निवासी वापरासाठीच . || कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली. || कोयना गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन संचालकात वादावादी ?. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा. || कृष्णा - कोयनेचा नदीकाठ उध्वस्त. || गौणखनिज माफिया व लोकप्रतिनिधींची भागीदारी. || करा कष्ट ...व्हा भष्ट तरच दिसेल.. सगळं स्पष्ट. || कैसा चलेगा..... बाबा - साहेब...!. || मानकुमरे म्हणतात... त्याला मस्ती आलीय- त्याला सटकून मारला पाहिजे. || कराड बाजार समितीसह उपसमित्यांचाही विकास करू : आ.बाळासाहेब पाटील. || सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा. || आशा शिंदे यांचे निधन. || कराड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सोयीची भूमिका. || भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेस कोलदांडा. || लग्न मिरवणुकीत हवेत गोळीबार. || नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला. || कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत. || कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू. || संभाजीराजे कीर्तिवंत, शूर राजे : धैर्यशील विजयसिंह पाटील  . || राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये. || जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता. ||
कोरेगाव मतदार संघातील रस्त्यांचे गौडबंगाल काय? रमेश उबाळे
  • निसार शिकलगार
  • Sat 17th Sep 2022 03:11 am

कोरेगाव : येथील रस्ता कागदावर तर बोरखळ येथील रस्त्याचा निधीचा पत्ताच नाही सातारा तालुक्यातील खेड येथील एक काँक्रिटीकरणं रस्ता कागदावर झाला आहे तर बोरखळ येथील झालेल्या रस्त्याचा निधीचा पत्ताच नाही. ही दोन्ही गावांचा कोरेगाव विधानसभा मतदार संघात समाविष्ट होत असून या रस्त्यांचे नक्की गौडबंगाल काय आहे? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी थेट जिल्ह्याधिकाऱ्यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे. याबाबत रमेश उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातारा शहराचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड येथे आमदारांच्या स्थानिक विकास निधी २०२१-२२ अंतर्गत मंजूर काम शिवसुंदर कॉलनी येथे रस्ता काँक्रिटीकरण व बंदिस्त गटर तयार करणे ८ लाख ४४ हजार ८६७ रुपये कामाची निविदा होऊन दि.११.०३.२०२२ रोजी काम सुरू झाले दि. २६.०५.२०२२ रोजी काम संपले.सदर काम सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या देखरेखीखाली झाले आहे. परंतु प्रत्यक्षात रस्ता व गटरचे काँक्रिटचे काम झाल्याचे दिसत नसून कागदावर व बोर्ड लावण्यापुरते मर्यादीत झाले आहे. मग काँक्रिट झालेच नाही तर हे काँक्रिट ठेकेदाराने खाल्ले की बांधकाम विभागाच्या अधिक्काऱ्यांनी खाल्ले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याउलट बोरखळ येथे जिल्हा परिषद शाळा ते गौरींचौकापर्यंत काँक्रिटकरण रस्ता व गटर झाली आहे. याची माहिती आपण शासनाकडे मागितली होती परंतु सदर माहिती आम्हाला देण्यात आली नाही. वास्तविक शासकीय निधीतून रस्ता व गटर झाले असेल तर ई टेंडर निविदा प्रक्रिया राबविणे आवश्यक असते परंतु तसे झाले नसल्याचे निदर्शनास येते.मग हा रस्ता कोणी दान धर्म म्हणून दिला आहे की साट्या लोट्यातुन झाला आहे? या बाबी विचारात घेऊन चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. खेड ग्रामपंचायतिच्या मालकीच्या जागेतील रस्ता व गटरवर निधी खर्ची होऊनही हा रस्ता फक्त कागदावरच दिसतो तर बोरखळ येथील रस्ता व गटरचे काम पूर्ण होऊनही यासाठी कोणता शासकीय निधी वापरण्यात आला हेच माहिती नाही. त्यामुळेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या रस्ता व गटरच्या कामाचे नक्की गौडबंगाल काय आहे? याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे लोकशाहीतला हा आमचा हक्क आहे. येत्या आठ दिवसात आम्हाला दोन्ही रस्ता व गटरच्या कामाची माहिती देऊन दोषीवर कारवाई करावी या कामामध्ये काही काळे बेरे झाले असल्यास दि.२३.०९.२०२२ रोजी उपोषणास बसू असा इशाराही रमेश उबाळे यांनी यावेळी दिला.चौकट बोरखळचा रस्ता कुणी दान धर्म म्हणून दिला का? बोरखळ ता.सातारा येथील रस्ता व गटरचे काम होवून सहा-सात महिने झाले हा रस्ता कोणत्या शासकीय निधीतून झाला की हा रस्ता जादूने झाला आहे याची माहिती आपण शासनाकडे मागीतली होती परंतु ही माहिती अद्याप आपणास मिळाली नाही. परंतु हा रस्ता कुणी दान धर्म म्हणून दिला आहे का? याची माहिती शासनाने आम्हाला द्यावी त्या दानशूर व्यक्तीचा आम्ही जाहीर सत्कार करू. असेही मत रमेश उबाळे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.खेड ता.कोरेगाव येथील शासकीय निधी पडूनही काम पूर्ण न झालेला हा रस्ता आहे.



©2025. All Rights Reserved.