माण : पिंपरी ता. माण येथे आज दि. 13/08/2022 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामख्याने विधवा प्रथा बंदीच्या विषयवार चर्चा केली गेली आणि सर्वानुमते विधवा प्रथा बंदीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यामुळे पिंपरी हे गाव माण तालुक्यातील विधवा प्रथा बंदी करणारे चौथ्या क्रमांकाचे गाव ठरले आहे.या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. कोमल शिरीष राजगे होत्या, विधवा प्रथा बंदी विषयीची मा. सरपंच चंद्रकांत शिलवंत यांनी सविस्तर माहिती दिली, त्यानंतर मा. सभापती नितीन राजगे , दिगंबर राजगे यांनी या विषयावर आपली मते परखडपणे मांडली, सर्वानुमते पिंपरी गावामधे विधवा प्रथा बंद करणेबाबत एकमत झाले व सर्व ग्रामस्थांनी सर्वानुमते हा ठराव मंजूर केला, सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये श्रीमती रुपाली सुळे व श्रीमती अलका पुकळे यांना सरपंच सौ. कोमल राजगे यांचे हस्ते हिरवा चुडा भरून हळदी कुंकू लावण्यात आले. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या निर्णयाचे स्वागत केले, खासकरून महिला मोठ्या संखेने या ग्रामसभेत उपस्थित होत्या .सदर ग्रामसभेस गुलाब राजगे सौ. उज्ज्वला ढवळे , सौ. राणी अवघडे , सौ. बुधावले , श्री. नारायण राजगे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते त्याचप्रमाणे भीमराव राजगे , सौ. स्वाती अहिवळे , किरण माने, आकराम राजगे , सुरेश राजगे , शहाजी अवघडे , डॉ. एल. बी. राजगे, पोलीस पाटील कैलास राजगे, रामभाऊ राजगे , वैभव शिंदे सर्व अंगणवाडी सेविका व आशा उपस्थिती होत्या , ग्रामसेवक सकट व शिंदे गुरुजी हेही उपस्थित होत्या.

©2026. All Rights Reserved.