कोरेगाव : मी शिवसेनेतच आहे फक्त नेतृत्व आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतायेत, त्यांच्यासोबत जाऊन बाळासाहेबांची शिवसेना जिल्ह्यात वाचवायचं काम मी आता हाती घेतले आहे, माझ्या वडिलांनी शिवसेनेत अनेक वर्षे काम केलं त्यामुळे मी लहानपणापासून शिवसेनेच्या विचाराचा बाळकडू पिलेला माणूस आहे. मी शिवसेनेत राहून अनेक समाजकार्य केलीत त्यात जिल्ह्यात युवकांचे मोठे संघटन करून शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्न हाती घेऊन ऊस उत्पादकासाठी मोठे आंदोलन उभे केले असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी नुकतेच शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्हा युवक शिवसेना अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली, निवड झाल्यानंतर रणजीतसिहं भोसले यांनी आपले विचार व्यक्त केले. सातारा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी नुकतेच प्रवेश केलेले रणजीत सिंह भोसले, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ शारदाताई जाधव यांनी प्रवेश केला व लगेचच काही दिवसात शिंदे गटाने त्यांची फेर निवड करण्यात आली. यावेळी त्यांना सातारा जिल्ह्याचे अधिकृत पत्र पक्षाचे सचिव श्री संजयजी मोरे, सचिव श्री किरण पावसकर, पक्ष प्रवक्त्या व उपनेत्या शितलताई मात्रे,सातारा संपर्कप्रमुख श्री शरदजी कणसे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.
. यावेळी बोलताना रणजीत भोसले पुढे म्हणाले " मी शिवसेनेत राहून जिल्ह्यातअनेक समाजकार्य केले, त्यात जिल्ह्यात युवकांचे मोठे संघटन करून विविध आंदोलन उभे केली. रास्ता रोको, मोर्चा, अधिकाऱ्यांना घेराव, आत्मदहन, अशी अनेक आंदोलने उभी केली, गोरगरिबांना कपडे वाटप असेल महिलांच्या हक्कासाठी त्यांचे संघटन करून त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडले आहेत. वयोवृद्धासाठी आरोग्य शिबिर घेऊन गरजूंना ऑपरेशन साठी मदतीचा हात दिला आहे. वीज प्रश्नासाठी हजारो तरुणांचा मोर्चा काढला आहे या सर्वांसाठी शिवसेनेचे बाळासाहेब यांची शिवसेना वाचवण्याचा पवित्रा घेतला, तशीच भूमिका घेत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आदरणीय बाळासाहेबांनी सांगितलं होतं बाळासाहेबांच्या विचाराचा सच्चा पाईक असलेले एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाचवण्यासाठी प्रयत्न केले याच प्रयत्नामध्ये माझा खरीचा वाटा असावा म्हणून मी एकनाथ शिंदे साहेबांच्या भूमिकेला पाठिंबा देत त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले. यावेळी सातारा जिल्हा संघटिका शारदाताई जाधव म्हणाल्या मी जिल्हा संघटिका म्हणून गेले नऊ वर्षे सक्रिय कार्यरत आहे. बऱ्याच वेळी मी महिलांचे अनेक कार्यक्रम राबवले त्यामध्ये महिलांचे आरोग्य शिबिर, महिलांचे रक्तदान शिबिर, भव्य होम मिनिस्टर कार्यक्रम, महिला बचत गट, हळदी कुंकू समारंभ,प्रशिक्षण शिबिर, युवकांसाठी रोजगार मेळावा, पूरग्रस्तांना मदत व अत्यावश्यक वस्तूचे वाटप, कोरोना योद्धा सत्कार,महिलांना मदत व मार्गदर्शन, संजय गांधी निराधार योजनेतून लाभार्थ्यांना मदत मिळवून देणे, व अनेक आंदोलने संघटनेच्या माध्यमातून राबवली व गरीब लोकांची व महिलांची संघटनात्मक बांधणी केली, आता आम्ही मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पाठिंबा देत त्यांच्यासोबत काम करण्याचा थांब निर्णय घेतला आहे. असे मत शारदाताई जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई, कोरेगाव खटाव चे लोकप्रिय आमदार महेश शिंदे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, जयवंतजी शेलार, चंद्रकांतजी जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक वासुदेव माने यांनी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले. या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते, मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते.
©2025. All Rights Reserved.