पाचगणी : राजपुरी (ता.महाबळेश्वर) येथील गेली ११ वर्षं बंद असणारी पाचगणी-राजपुरी बस सेवा आम्हीच सुरू केली असल्याचे फुकटचे श्रेय घेणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांचा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांनी समाचार घेतला.
यावेळी राजेंद्रशेठ म्हणाले पाचगणी-राजपुरी बस सेवा सुरु करण्याच्या संदर्भात भाजपने केलेला दावा पुर्णतः चुकीचा आहे.बस सुरू करण्यासंदर्भात आम्ही गेली अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहोत.बस सेवा सुरु संदर्भात महाबळेश्वर पंचायत समितीच्या वतीने ठराव घेण्यात आला.त्याचबरोर राजपुरी,आंब्रळ, खिंगर ग्रामपंचायत ठराव देण्यात आले.गावांच्या वतीने वेळोवेळी आगारप्रमुखाना निवेदनही देण्यात आले.जिल्हा परिषद शाळां,पाचगणीतील महाविद्यालयाचे मागणी पत्र देण्यात आले.आमदारांच्या मार्फत जिल्हा आगारप्रमुखाना बस सेवा सुरु करण्यासंदर्भात सुचवले.भिलार येथे परवा झालेल्या महाराजस्व अभियानात बस सेवा सुरु करण्यासाठी अधिकाऱ्यांना साकडे घालून आम्ही आक्रमक पवित्रा घेतला.याची अधिकारी व आगारप्रमुखांनी दखल घेऊन चाचणीसाठी बस पाठवली.बस सुरू होणार असल्याची गोष्ट भाजपवाल्यांना समजताच नेहमीप्रमाणे त्यांच्याकडून पेढे वाटून फोटो काढण्यात आले.प्रत्येक्ष काम न करता पुर्ण झालेल्या योजनांवर जाऊन फोटो काढायचे व हे काम आम्हीच केलय असा दिखावा करायचा.आणि जनतेच्या डोळ्यात धूळफेक करायची परंतु जनतेला पुर्णपणे माहीत आहे की वेळोवेळी कोणी प्रयत्न केले व आक्रमक भूमिका कोणी घेतली.भाजपच्या या केविलवाण्या प्रयत्नांना जनता थारा देणार नाही.
©2026. All Rights Reserved.