माण : मार्डी ता.माण येथील श्री सदाशिवराव पोळ विकास सेवा सोसायटीच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित गावातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील प्रत्येक वर्गातील गुणवंत विद्यार्थी ,शालेय क्रीडा स्पर्धा ,इतर स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विधार्थ्यास प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले . तसेच विविध क्षेत्रातुन चालुवर्षी सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला .युवा नेते डॉ संदीप दादा पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन योगेश पोळ , व्हा . चैरमन डॉ विद्या काळे , संचालक डॉ भारती ताई पोळ , शिवाजी पोळ, रवींद्र पोळ , जयश्री पोळ, ब्रम्हदेव नारनवर यांनी हा आगळा वेगळा निर्णय घेतला. सन्मानामुळे विद्यार्थी व सेवानिवृतांचे मनोबल वाढत आहे .या निर्णयाचे ग्रामस्थामधुन कौतुक होत आहे .यावेळी डॉ. संदीप पोळ यांच्यासह सर्व संचालक , ग्रामस्थ ,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन सचिव अभय पोळ यांनी केले
©2026. All Rights Reserved.