ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
सैदापूर -विद्यानगरीच्या चौफेर विकासासाठी कटिबद्ध - भाजपा जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे
  • Satara News Team
  • Mon 3rd Oct 2022 09:58 am

कराड :  कराड शहरालगत असलेल्या सैदापूर विद्यनगर परिसरात गेल्या अनेक वर्षापासून असलेल्या समस्या मोठ्या असून ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीनिवास जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आगामी २ वर्षात सैदापूर विद्यानगर परिसरातील एकही समस्या शिल्लक राहणार नाही या परिसरासाठी भाजपाच्या वतीने कोट्यावधी रुपयाचा विकास निधी खेचून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी दिला. भारतीय जनता पक्षाच्यावतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा 'सेवा पंधरवडा' म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्ताने कराड दक्षिणमध्ये संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, संवाद यात्रेदरम्यान सैदापुर येथील मेळाव्यात ते बोलत होते यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य व कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल बाबा भोसले ,ज्येष्ठ मार्गदर्शक श्रीनिवास जाधव साहेब ,सैदापूरचे माजी उपसरपंच मोहनराव जाधव, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, भारतीय जनता पार्टी कराड दक्षिण उपाध्यक्ष मुरलीधर जाधव, ग्रामपंचायत सदस्य धनाजी जाधव ,सैदापूर विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन जिजाबा जाधव, सुहास जाधव ,लहूराज जाधव ,बाळासाहेब बागडे, भाजपा कराड शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ .सीमा घार्गे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती .
यावेळी सैदापुर विदयानगर येथील अंतर्गत रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना श्रीनिवास जाधव म्हणाले ,महाराष्ट्रात विद्यानगरी म्हणून परिचित असलेले सैदापूर आता प्रगतीच्या दिशेने नक्की पाऊल टाकणार असून सैदापूर गावातील रस्ते करण्यात मध्ये आम्ही यशस्वी झालो आहे .मात्र विद्यानगर हे शैक्षणिक संकुल असून या ठिकाणी असलेल्या अंतर्गत रस्ते ,लाईट,ड्रेनेज व इतर सुविधा यासाठी खूप मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व इतर मंत्र्यांच्या माध्यमातून या परिसरातील विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल .यावेळी बोलताना भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य डाॅ.अतुल भोसले म्हणाले ,कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघांमध्ये कोट्यावधी रुपयाची रस्त्यांची विकास कामे श्रीनिवास जाधव साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने पूर्ण झाली आहेत. या पुढील काळात विद्यानगर मधील एकही प्रश्न शिल्लक ठेवला जाणार नाही वाटेल तेवढा निधी भाजपाच्या माध्यमातून आम्ही देण्यासाठी कटिबद्ध आहोत. या पुढील काळात सैदापूर विद्यानगर परिसरातील ग्रामस्थांनी एक दिलाने राहून भाजपाच्या पाठीमागे एकसंघ ताकद उभी करावी. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी कार्यक्रमास धनाजी जाधव, जिजाबा साळुंखे, विजय जाधव, संग्राम जाधव, प्रकाश जाधव, शिवाजीराव जाधव, पोलीस पाटील संजय पाटील, लहुराज जाधव, डॉ. सुशांत मोहिते, प्रशांत देसाई, अनिल पाटील,अमोल देशमुख, अजित पाटील गोवारे गावचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, विदयानगर येथील स्थानिक ग्रामस्थ, जेस्ट नागरिक संघांचे सदस्य सैदापूर ग्रामस्थ स्थानिक मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते सैदापूर विद्यानगर परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी आमदार जयकुमार गोरे व अतुल बाबा भोसले यांचा सत्कार केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन करताना सैदापूरचे माजी उपसरपंच मोहनराव जाधव यांनी विद्यानगर परिसरातील विविध प्रश्न मान्यवरांच्या समोर मांडले मात्र आगामी काळात भाजपाच्या पाठीशी युवा वर्ग ठामपणे उभा असून विद्यानगरचा कायापालट करण्यासाठी मोठा निधी मिळावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.



©2026. All Rights Reserved.