विद्यापीठ चालवणे हे आव्हान असले तरी आमची बलस्थाने म्हणजे ए प्लस दर्जाची कॉलेजेस असून ती स्वायत आहेत. रयत शिक्षण संस्था ही अतिशय शक्तिशाली संस्था आहे. आपले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे ग्रामीण भागातील अतिशय चांगल्या उपलब्धी असलेले विद्यापीठ आहे.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू
- कुलाधिकारी मा.चंद्रकांत दळवी
कराड :
विद्यापीठ चालवणे हे आव्हान असले तरी आमची बलस्थाने म्हणजे ए प्लस दर्जाची कॉलेजेस असून ती स्वायत आहेत. रयत शिक्षण संस्था ही अतिशय शक्तिशाली संस्था आहे. आपले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे ग्रामीण भागातील अतिशय चांगल्या उपलब्धी असलेले विद्यापीठ आहे. तुलनात्मक दृष्ट्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू ‘’असे अभिवचन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त प्रथम कुलाधिकारी चंद्रकात दळवी यांनी दिले.
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा कार्यभार घेण्यासाठी ते आले होते. यावेळी विद्यापीठाने यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आयोजित केलेल्या स्वागत समारंभात ते बोलत होते. यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य डॉ. बी.टी.जाधव, प्राचार्य डॉ. बाळ कांबळे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थित होते
दळवी म्हणाले, रयतचे हायस्कूल आमच्या गावात नसते तर मी या पदावर नसतो. कर्मवीरांच्या नावाने असलेल्या विद्यापिठाचा कुलाधिकारी होणे हे माझ्यासाठी खूप संस्मरणीय व भाग्यशाली असा दिवस आहे. मी हनुमान विद्यालय निढळ येथे शिकलो.आहे ग्रामीण जीवन मी अनुभवले आहे. हे पद म्हणजे एक नैतिक जबाबदारी आहे. विद्यापीठातील सर्व प्राध्यापक हे सारथी आहेत. मी वेळच्या वेळी निर्णय घेऊन कामे पूर्ण करीन अशी ग्वाही त्यांनी दिली. कुलगुरू प्रा. डी. टी. शिर्के यांच्या ज्ञानाचा फायदा घेऊन आपण विद्यापीठाचे काम गतिमान करू असेही यावेळी त्यांनी सांगितले.
कर्मवीरांनी अनेक वेळा पाहिलेले स्वप्न आज पूर्ण होत आहे. अण्णांचे स्वप्न पूर्ण करताना प्रचंड झगडावे लागले. २०१३ पासून आम्ही स्वायत्त होण्यासाठी काम केले. आज जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ बनवण्याची ताकद आपल्यात आहे. ५० वर्षे वाटचाल केलेली कॉलेज सर्व प्रकारची उत्कृष्टता आपण मिळवली आहे. उशीर झाला असला असला तरी पडलेले दान अप्रतिम आहे. अण्णांच्या नावे कॉलेज असल्यामुळे त्याला ग्लोबल दर्जा हवा आहे. हे विद्यापीठ आमच्या रयतच्या अनेक कॉलेजला मार्गदर्शक ठरावे हीच इच्छा आहे.
- डॉ. अनिल पाटील
चेअरमन रयत शिक्षण संस्था.
©2024. All Rights Reserved.