ताज्या बातम्या
आधे इधर जाओ...आधे उधर चलो..... || म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो...! . || कृष्णेच्या रणांगणातून बाबांनी काढला पळ. || कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...!. || कराड चावडीवर एकास हग्यामार . || चंदेरीसोनेरी झगमगाट... कराड पोलिसांच्या चावडीवर चर्चांचा घमघमाट. || कृष्णा-कोयना पतसंस्थेसह कराड अर्बन बँक चौकशीच्या फेऱ्यात . || कराड तहसिलदारांच्या आदेशला केराची टोपली. || अबब... लाल मातीचा एक प्रस्ताव खर्ची तब्बल 67 हजार. || कराड आरटीओच्या रेटकार्डची चर्चा जोमात . ||  कराड ‘आरटीओ‘ची तऱ्हा  न्यारी. || कोयना - कृष्णेच्या काठाला जेसीबी पोकलॅन्डचा बोलबाला. || जिल्हाधिकारी साहेब...! कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा. || कृष्णा कारखान्यावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. || घर तिथे संविधान. || कासारशिरंबेतील पुलाच्या उभारणीमुळे दळणवळणाला मिळणार चालना : डॉ. अतुल भोसले. || साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा . || अजय कुमार मिश्रा यांची विकसित भारत संकल्प यात्रा*. || कराड उत्तर मंडलात भाजपच्या निवडी जाहीर......!. || अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा. || बकरीद ईदची सामुदायिक नमाज रद्द. || प्रियांका प्ले हाऊस बंद होणार. || प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम. || प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ. || बेमुदत आंदोलनास पोलीस छावणीचे स्वरूप. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा. || कोयना गृहनिर्माणच्या सदस्यांचे बेमुदत धरणे आंदोलन. || सातारा पालिकेत मुकादमांच्या बोगस सह्यांचा गोलमाल. || गृहनिर्माण सोसायटी फक्त निवासी वापरासाठीच . || कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली. || कोयना गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन संचालकात वादावादी ?. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा. || कृष्णा - कोयनेचा नदीकाठ उध्वस्त. || गौणखनिज माफिया व लोकप्रतिनिधींची भागीदारी. || करा कष्ट ...व्हा भष्ट तरच दिसेल.. सगळं स्पष्ट. || कैसा चलेगा..... बाबा - साहेब...!. || मानकुमरे म्हणतात... त्याला मस्ती आलीय- त्याला सटकून मारला पाहिजे. || कराड बाजार समितीसह उपसमित्यांचाही विकास करू : आ.बाळासाहेब पाटील. || सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा. || आशा शिंदे यांचे निधन. || कराड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सोयीची भूमिका. || भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेस कोलदांडा. || लग्न मिरवणुकीत हवेत गोळीबार. || नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला. || कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत. || कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू. || संभाजीराजे कीर्तिवंत, शूर राजे : धैर्यशील विजयसिंह पाटील  . || राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये. || जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता. || प्लास्टर ऑफ पॅरिसच्या  (पी.ओ.पी.) मूर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई. ||
साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा 
  • Aavaj Daily Team
  • Mon 1st Jan 2024 09:39 pm

सातारा  : केंद्र शासनाच्या योजनांचा सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ मिळावा या मुख्य उद्देशाने विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे; यात्रेचा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन जास्तीत जास्त  पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा 

समन्वयाने काम करुन जास्तीत जास्त लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

 

सातारा  : केंद्र शासनाच्या योजनांचा सर्वसामान्य लाभार्थ्यांना लाभ मिळावा या मुख्य उद्देशाने विकसित भारत यात्रा सुरू झाली आहे; यात्रेचा उद्देश सफल होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करुन जास्तीत जास्त  पात्र लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, संकल्प यात्रेच्या निमित्ताने विविध योजनांची माहिती सांगणारे चित्ररथ गावांमधे जनजागृती करत आहेत. कार्यक्रमाच्या दिवशी त्या गावात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये गावातील जास्तीत जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी करावी आयुष्यमान भारत योजना कार्ड तसेच विविध दाखल्यांचे वाटप करावे

विकसित भारत संकल्प यात्रा जाणाऱ्या गावांमध्ये तेथे बँकांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ द्यावा.   विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात यशस्वी होण्यासाठी तयार केलेल्या आराखड्यानुसार तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी काम करावे. प्रत्येक गावत होणाऱ्या यात्रेमध्ये तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून तसा अहवाल सादर करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी  डुडी यांनी दिले.

  विकसित भारत संकल्प यात्रा जिल्ह्यात यशस्वी करण्यासाठी जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांचा समन्वय अधिक महत्वाचा  आहे. यात्रेच्या निमित्ताने ग्रामीण भागातील नागरिकांना विविध योजनांचा लाभ द्या,

ज्ञानेश्वर खिलारी

 मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा



©2024. All Rights Reserved.