"प्रियांका प्ले हाऊस"ला सोसायटीत व्यवसाय करण्याची मान्यता देण्याच्या कारणावरून चेअरमन शिवाजी चव्हाण व संचालक रमन पारवे यांच्या जोरदार वादावादी
कोयना गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन संचालकात वादावादी ?
"प्रियांका प्ले हाऊस" ला मान्यता देण्यावरून कळवंड
आजच्या विशेष सभेकडे लक्ष
कराड:
गृहनिर्माण सोसायटीची घटना व उपविधी केराची टोपली दाखवत कोयना सहकारी दुध पुरवठा संघाच्या सेवकांची सहकारी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाने येथील रहिवाशी व सदस्यांचा विरोध डावलून येथे बेकायदेशीरपणे सुरू अडलेल्या प्रियांका प्ले हाऊसला सोसायटीत व्यवसाय करण्याची मान्यता देण्याच्या कारणावरून चेअरमन शिवाजी चव्हाण व संचालक रमन पारवे यांच्या जोरदार वादावादी झाली. ही घटना दि.१३ मे रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडल्याचे बोलले जात आहे. मुळात संबंधी प्ले हाऊस अन्यत्र स्थलांतरीत कारण्यासंबंधी सोसायटीने ठराव केलेला आहे. मात्र, विशेष सभा बोलवून हा ठराव बदलण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे या वादळी सभेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
त्याचे घडले असे, गेले ३० वर्षांपासून ठक्कर यांचा "प्रियांका प्ले हाऊस" या नावाने व्यवसायात कोयना कॉलनीत सुरू आहे. सुरुवातीच्या काळात विद्यार्थी संख्या नगण्य होती. त्यामुळे येथील सदस्यांनी याकडे दुर्लक्ष केले मात्र, कालांतराने विद्यार्थी संख्या 100 हुन अधिक झाली. याचा त्रास सोसायटी सदस्यांना होऊ लागला. सोसायटीत वाहनांची वर्दळ वाढली, गोंगाट वाढला. येथील शांततेचा भंग होऊ लागल्याने संबंधित प्ले हाऊस सोसायटीतून बंद करावे, अशी मागणी होऊ लागली. राहत्या घरात सुरू असलेले प्ले हाऊस आणि अपुऱ्या शैक्षणिक सुविधा, विद्यार्थ्यांचा कोंडवारा आदी बाबी आणि भरमसाठ फी घेऊन पालकांची आर्थिक पिळवणूक, निवासी सदनिकेत प्ले हाऊस चालवून पालिकेच्या व्यवसायिक कराची बुडवणूक आदी बाबींचा विचार करून सोसायटीने प्रियांका प्ले हाऊस सोसायटीतून स्थलांतरित करण्याचा ठराव सोसायटीच्या मीटिंग एकमताने झाला. तशी सूचनाही संबंधित प्ले हाऊस चालक यांना देण्यात आली.
मात्र, प्ले हाऊस स्थलांतरित न करता पुन्हा नवीन प्रवेश घेण्यास सुरूवात झाली. त्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी पहिल्याचा प्रशासनासह प्ले हाऊस चालक, सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन यांना नोटीस बजावली. त्यानंतर प्रशासनाच्या सर्व विभागास स्थानिक लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार
केली. दरम्यान पालक मंत्री देसाई यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेशही दिले.
असे असतानाही चेअरमन शिवाजी चव्हाण हे सोसायटी सदस्यांच्या हिता विरोधात जाऊन सोसायटी घटना, उपविधीचे उल्लंघन करून यापूर्वी सोसायटी हिताचा केलेला ठराव रद्द करण्याचा हट्ट करत आहेत. त्यासाठी सोसायटीची विशेष सभा त्यांनी बोलावली आहे. याचा जाब विचारण्यासाठी गेलेले संचालक रमन पारवे यांच्याशी त्यांनी वादावाद करून शिवीगाळ केली तसेच धक्काबुक्की झाल्याच्या चर्चेने सोसायटीचे वातावरण तंग झाले आहे. त्यामुळे आजच्या सोसायटी विशेष सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
चेअरमन यांचा हट्ट का?
कराड शहरात काही मोजक्या गृहनिर्माण सोसायटी कार्यरत आहेत यापैकी जुनी गृहनिर्माण संस्था म्हणून कोयना दूध संघाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवक गृहनिर्माण संस्थेकडे पाहिले जाते. अशाच पद्धतीचे कराड शहरातील शिवाजी हाऊसिंग सोसायटीमध्ये सुरू असलेले बेकायदेशीर प्ले हाऊस सोसायटीच्या सदस्यांनी केलेली तक्रार आणि सोसायटीच्या ठरावाने तात्काळ स्थलांतरित झाले. या प्ले हाऊसची व्याप्ती सुद्धा खूप मोठी असतानाही सोसायटीच्या ठरावाने आणि सदस्यांच्या तक्रारीने ते बंद झाले आहे. मात्र कोयना कॉलनीतील गृहनिर्माण संस्थेने प्रियांका प्ले हाऊस स्थलांतरित करण्याचा केलेला ठराव मोडून प्ले हाऊसच्या बाजूने सोसायटी सदस्यांचे हित डावलून ठराव करण्याचा चेअरमन यांचा हट्ट का ? यामागे नेमके कारण काय? याविषयीची उलट सुलट चर्चा सुरू आहे.
पोलीस व पालिका प्रशासनाची बघ्याची भूमिका
कोयना कॉलनीतील सोसायटी सदस्य चेअरमन आणि प्ले हाऊस यांचा वाद मंत्रालयापर्यंत पोहोचला. तरीसुद्धा येथील पालिका आणि पोलीस प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही. पालिकेकडे व पोलीस प्रशासनाकडे रीतसर तक्रारी करूनही सोसायटीच्या घटनात्मक तरतुदी तसेच उपविधीचे उल्लंघन करून येथे कायदा सुव्यवस्था, शांतता भंग आणि पालिकेच्या टॅक्सेशनचा प्रश्न, शैक्षणिक मान्यता आदी प्रश्न असतानाही याबाबतची कुठलीही ठोस भूमिका या दोन्ही प्रशासनाकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि पालिका प्रशासनाला मॅनेज केल्याची चर्चा आहे.
©2024. All Rights Reserved.