ताज्या बातम्या
आधे इधर जाओ...आधे उधर चलो..... || म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो...! . || कृष्णेच्या रणांगणातून बाबांनी काढला पळ. || कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...!. || कराड चावडीवर एकास हग्यामार . || चंदेरीसोनेरी झगमगाट... कराड पोलिसांच्या चावडीवर चर्चांचा घमघमाट. || कृष्णा-कोयना पतसंस्थेसह कराड अर्बन बँक चौकशीच्या फेऱ्यात . || कराड तहसिलदारांच्या आदेशला केराची टोपली. || अबब... लाल मातीचा एक प्रस्ताव खर्ची तब्बल 67 हजार. || कराड आरटीओच्या रेटकार्डची चर्चा जोमात . ||  कराड ‘आरटीओ‘ची तऱ्हा  न्यारी. || कोयना - कृष्णेच्या काठाला जेसीबी पोकलॅन्डचा बोलबाला. || जिल्हाधिकारी साहेब...! कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा. || कृष्णा कारखान्यावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. || घर तिथे संविधान. || कासारशिरंबेतील पुलाच्या उभारणीमुळे दळणवळणाला मिळणार चालना : डॉ. अतुल भोसले. || साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा . || अजय कुमार मिश्रा यांची विकसित भारत संकल्प यात्रा*. || कराड उत्तर मंडलात भाजपच्या निवडी जाहीर......!. || अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा. || बकरीद ईदची सामुदायिक नमाज रद्द. || प्रियांका प्ले हाऊस बंद होणार. || प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम. || प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ. || बेमुदत आंदोलनास पोलीस छावणीचे स्वरूप. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा. || कोयना गृहनिर्माणच्या सदस्यांचे बेमुदत धरणे आंदोलन. || सातारा पालिकेत मुकादमांच्या बोगस सह्यांचा गोलमाल. || गृहनिर्माण सोसायटी फक्त निवासी वापरासाठीच . || कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली. || कोयना गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन संचालकात वादावादी ?. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा. || कृष्णा - कोयनेचा नदीकाठ उध्वस्त. || गौणखनिज माफिया व लोकप्रतिनिधींची भागीदारी. || करा कष्ट ...व्हा भष्ट तरच दिसेल.. सगळं स्पष्ट. || कैसा चलेगा..... बाबा - साहेब...!. || मानकुमरे म्हणतात... त्याला मस्ती आलीय- त्याला सटकून मारला पाहिजे. || कराड बाजार समितीसह उपसमित्यांचाही विकास करू : आ.बाळासाहेब पाटील. || सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा. || आशा शिंदे यांचे निधन. || कराड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सोयीची भूमिका. || भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेस कोलदांडा. || लग्न मिरवणुकीत हवेत गोळीबार. || नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला. || कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत. || कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू. || संभाजीराजे कीर्तिवंत, शूर राजे : धैर्यशील विजयसिंह पाटील  . || राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये. || जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता. || प्लास्टर ऑफ पॅरिसच्या  (पी.ओ.पी.) मूर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई. ||
कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत
  • Aavaj Daily Team
  • Fri 24th Mar 2023 11:09 am

टेंभूचे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने शहराला स्वच्छ पाणी मिळत नाही व काही वेळेला रोगराई सुद्धा पसरते, पुराच्या वेळी पाणी अत्यंत खराब येत असल्याचे दिसते यामुळे वारुंजी येथे बंधार्‍याचे काम सुरू आहे ते जलद गतीने पूर्ण केले जावे जेणेकरून कोयना नदीचे स्वच्छ पाणी नगरपालिकेकडून उचलले जाईल व ते पाणी दोन्ही शहरांना मिळेल. तसेच टेंभू योजनेच्या फुगीचे पाणी वारुंजी बंधार्‍याच्या पुढे अडविले जाईल.

 

 


कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत
 

- आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उठवला आवाज


 कराड :

टेंभू योजनेच्या बंधार्‍यामुळे बॅक वॉटरची फुग कराड शहर ते वारुंजी पर्यंत असते. हे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने त्या ठिकाणी खड्डा पडतो व पाणी तिथेच अडकून राहते. तसेच कराड व मलकापूर शहराचे सांडपाणी याच ठिकाणी सोडले जाते. वारुंजी जवळील भागात मलकापूर व कराड नगरपालिका नदीतील पाणी उपसा करीत असते. दोन्ही शहराचे सोडलेल्या सांडपाण्यामुळे व टेंभूचे पाणी वेळच्यावेळी उपसले जात नसल्याने शहराला स्वच्छ पाणी मिळत नाही व काही वेळेला रोगराई सुद्धा पसरते, पुराच्या वेळी पाणी अत्यंत खराब येत असल्याचे दिसते यामुळे वारुंजी येथे बंधार्‍याचे काम सुरू आहे ते जलद गतीने पूर्ण केले जावे जेणेकरून कोयना नदीचे स्वच्छ पाणी नगरपालिकेकडून उचलले जाईल व ते पाणी दोन्ही शहरांना मिळेल. तसेच टेंभू योजनेच्या फुगीचे पाणी वारुंजी बंधार्‍याच्या पुढे अडविले जाईल, असा कराड शहरासाठी महत्वाचा प्रश्न आज विधानसभेतील चर्चेत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.

दरम्यान, टेंभू योजनेमध्ये अनेक शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्या आहेत तसेच त्यांना पूर्ण मोबदला सुद्धा अजून मिळालेला नाही तर अशा शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळावा, अशी सुद्धा मागणी आ. चव्हाण यांनी विधानसभेत केली.


 वारुंजी येथील प्रस्तावित बांधार्‍याचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती देत ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी टेंभू योजनेत गेल्या आहेत त्यांना सुद्धा पूर्ण मोबदला देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
 
 - देवेंद्र फडणवीस
 उपमुख्यमंत्री महाराष्ट्र

 



©2024. All Rights Reserved.