ताज्या बातम्या
खा. उदयनराजे भोसले यांची आनंदराव पाटील यांच्या घरी सदिच्छा भेट. || कराडच्या नगराध्यक्षपदावर भाजपचाच दावा - आमदार डॉ. अतुल भोसले. || कराडमध्ये ‘रन फॉर युनिटी’ दौड उत्साहात . || अतुलबाबांमुळे जनशक्ती आघाडी भाजपमय . || ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील यांचा आज ९० वा वाढदिवस. || कै. विलास पवारांच्या स्मरणार्थ मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणगी. || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर बिनविरोध. || राष्ट्रवादीच्या कराड दक्षिण पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर . || कराड अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी समीर जोशी, उपाध्यक्षपदी शशांक पालकर यांची बिनविरोध निवड. || डॉ. अंजनी शाह यांना महिला शक्ती गौरव पुरस्कार. || कृष्णा नदी काठावर पूरसंरक्षक भिंत बांधण्यासाठी १६ कोटी ९२ लाख रुपयांचा निधी मंजूर. || जयवंत शुगर्सचा ३२६० रुपयांचा अंतिम ऊस दर - डॉ. सुरेश भोसले. || कराड मर्चंटकडून दसऱ्याच्या मुहूर्तावर ४८ वाहनांचे वितरण. || कराड बाजार समिती सभापतीपदी शंकरराव इंगवले यांची बिनविरोध निवड. || राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कराडमध्ये आज विजयादशमी उत्सव व पथसंचलन. || कृष्णा विश्व विद्यापीठात जागतिक हृदय दिन विविध उपक्रमांनी साजरा. || राज्य कबड्डी संघटनेची निवडणूक अपात्र. || दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कराड अर्बन बँकेकडून १५ कोटींचे वाहनकर्ज वितरण. || कराड अर्बन बँकेच्या सेवक प्रशिक्षण केंद्राला ‘स्पेशल ज्युरी ॲवार्ड-टीम’ पुरस्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्यावतीने ज्येष्ठांचा सत्कार. || श्री मळाईदेवी पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी. || शिवराय पराक्रमी योद्धेच नव्हे, मुस्तुद्दी व दूरदृष्टी राज्यकर्ते - केतन पुरी. || श्री कालिकादेवी पतसंस्थेचा २९२ कोटींचा एकत्रित व्यवसाय. || संकट त्यांच्याच वाट्याला येतात ज्यांची पेलायची ताकद असते. || श्री मळाईदेवी पतसंस्थेच्या मल्हारपेठ शाखेचा शुभारंभ. || उस उत्पादक शेतकऱ्यांना किमान ४००० दर मिळालाच पाहिजे - अशोकराव थोरात. || श्री कालिकादेवी पतसंस्थेची शनिवारी वार्षिक सभा . || शेरे येथे गुरुवारी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन. || जनकल्याण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर देशपांडे, उपाध्यक्षपदी अभिजीत चाफेकर यांची फेरनिवड. || दादासाहेब मोकाशी आयटीआयमध्ये पदवीदान समारंभ दिमाखात. || कराड रोटरी क्लबला पद्मभूषण बाबासाहेब कल्याणी यांची भेट. || विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चितीतून यश संपादन करावे - डॉ. सुरेश भोसले. || कराड एसटी आगाराची राज्यस्तरीय परिक्षण समितीकडून पाहणी. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना स्मृतिदिनानिमित्त मान्यवरांकडून अभिवादन. || कृष्णा कारखान्यावर सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांना अभिवादन. || कराड विमानतळ विस्तारीकरण पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी निधी मंजूर. || सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांची मंगळवारी १२ वी पुण्यतिथी. || सीए. धनंजय शिंगटे कराड अर्बन बँकेचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. || शेतकरी कामगार पक्षाचा ७८ वा वर्धापन दिन कराडमध्ये साजरा . || महसूल सप्ताहात विविध उपक्रमांचे आयोजन - प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे . || कारगिल शौर्य दिन कराडमध्ये उत्साहात साजरा. || सैदापूर बिजोत्पादन प्रक्षेत्र शेतकऱ्यांच्या प्रगतीचे केंद्र ठरणार - डॉ. शिर्के . || सीए दिलीप गुरव यांना ‘सर्वोत्तम प्रभावशाली नेतृत्व’ राष्ट्रीय पुरस्कार. || कृष्णा बँकेचा ‘उत्कृष्ट नागरी सहकारी बँक’ पुरस्काराने मुंबईत गौरव. || 'कृष्णा’च्या महिला सभासद शेतकरी गिरवणार अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे. || कराड अर्बन बँकेचे आता महाराष्ट्रभर कार्यक्षेत्र सभेत मंजुरी. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात मंगळवारी महारक्तदान अभियान. || कृष्णा कारखान्याला सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. || कोयना सहकारी बँकेची बिनविरोध निवडणूक. ||
नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला
  • Aavaj Daily Team
  • Fri 24th Mar 2023 02:55 pm

कराड: लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार श्रीनिवास पाटील हे सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध मुद्द्यांवरती आवाज उठवत असून त्यांनी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी प्रदूषण संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.

नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला

 खा.श्रीनिवास पाटील; लोकसभेत मागणी 

कराड :  
      जल प्रदुषण टाळण्यासाठी आवश्यक पाऊले उचलणे गरजेचे आहे. सातारा जिल्ह्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी कोणते उपाय केले आहेत असा प्रश्न उपस्थित करत नद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा अशी मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली.

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार श्रीनिवास पाटील हे सातारा लोकसभा मतदारसंघातील विविध मुद्द्यांवरती आवाज उठवत असून त्यांनी जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी प्रदूषण संदर्भात देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. नदीचे पाणी प्रदूषण समस्या सोडवण्यासाठी सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत का? असा सवाल त्यांनी केला. खा.पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री बिश्वेश्वर तुडू यांनी उत्तर पाठवले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) राष्ट्रीय पाणी गुणवत्ता निरीक्षण कार्यक्रम अंतर्गत ४ हजार ४८४ मॉनिटरिंग स्टेशनच्या नेटवर्कद्वारे देशात वेळोवेळी नद्या आणि इतर जलस्रोतांच्या पाण्याच्या गुणवत्तेचे परीक्षण वेगवेगळ्या राज्य, केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा प्रदूषण नियंत्रण समितीच्या सहयोगाने करत असते. नोव्हेंबर २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या नवीनतम केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, जैविक प्रदूषणाचे सूचक बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड (बीओडी) पातळीच्या संदर्भात निरीक्षण परिणामांवर आधारित २७९ नद्यांवर ३११ प्रदूषित नदीचे पट्टे ओळखण्यात आले.

या कार्यक्रमातंर्गत महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कृष्णा, वेण्णा, कोयना, नीरा आणि ५ नद्यांवरील १२ ठिकाणी निरिक्षण केले होते. या निरिक्षण करण्यात आलेल्या १२ पैकी ११ ठिकाणी ३.० मिलीग्राम/लिटर पेक्षा जास्त बीओडी पातळीच्या वर प्रदूषित असल्याचे आढळून आले आहे. नद्यांची स्वच्छता, पुनरुत्थान ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. पाणी हा राज्यांचा विषय असल्याने त्याची जबाबदारी राज्य, केंद्रशासित प्रदेश, स्थानिक संस्था आणि उद्योगांची आहे. सांडपाणी आणि औद्योगिक सांडपाणी जमिनीत अथवा जलस्रोतांमध्ये सोडण्यापूर्वी विहित नियमांनुसार सोडावे किंवा त्याचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. 
      राज्य, केंद्रशासित प्रदेशांनी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांना गंगा आणि तिच्या उप नद्यांना वगळून केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नदी संवर्धन योजना (एनआरसीपी) माध्यमातून देशातील नद्यांच्या निवडलेल्या प्रदूषित क्षेत्राच्या संवर्धनासाठी आर्थिक आणि तांत्रिक सहाय्यतेसाठी मदत करत असते. एनआरसीपी अंतर्गत राज्य, केंद्रशासित प्रदेशांकडून वेळोवेळी प्रस्ताव प्राप्त होत असतात. त्याची प्राथमिकता,  मार्गदर्शक तत्वाच्या अनुशंगाने तसेच योजना निधीची उपलब्धतेच्या आधारावर विचारात घेतले जातात. असे आलेल्या उत्तरात म्हटले आहे.



©2026. All Rights Reserved.