देशात 'घर घर मोदी'चा नारा दिला जात आहे. तर भाजप ग्रामीण भागात रूजवण्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे पाहिजे जाते. मात्र, कराड तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था मिळवण्यासाठी भाजपाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जुळवून घेतल्याचे चित्र आहे. अशा निवडणुकात पक्षीय धोरण, अजंडा नसतो शिवाय या निवडणुका पक्षीय चिन्हावर नसतात, असे मत भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी मांडताच त्याला दुजोरा तावडे यांनी दिल्याने भाजप कोट्यात अस्वस्थता पसरली आहे.
भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेस कोलदांडा
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वपक्षीय युतीचा फंडा
- पक्षीय धोरणाला खो; म्हणे, निवडणुका होऊ द्या मग पाहू
कराडः
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 'काँग्रेस मुक्त भारत' ही घोषणा भारतीय जनता पार्टीने केली आहे. त्यानुसार भाजपच्या 'लोकसभा प्रवास योजनेस' प्रारंभ झाला. परंतु, कराड तालुक्यातील भाजपकडून पक्ष धोरणा विरोधी सुरू असलेल्या कामाची कबुली आणि समर्थन दस्तुर खुद्द भाजपाचे नवनिर्वाचित राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी केले.
एक बाजुला 'घर घर मोदी'चा नारा दिला जात आहे. तर भाजप ग्रामीण भागात रूजवण्यासाठी केंद्र आणि राज्य पातळीवर मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे पाहिजे जाते. मात्र, कराड तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था मिळवण्यासाठी भाजपाने काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जुळवून घेतल्याचे चित्र आहे. अशा निवडणुकात पक्षीय धोरण, अजंडा नसतो शिवाय या निवडणुका पक्षीय चिन्हावर नसतात, असे मत भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांनी मांडताच त्याला दुजोरा तावडे यांनी दिल्याने भाजप कोट्यात अस्वस्थता पसरली आहे.
नवीन १८ लोकसभा मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने लोकसभा प्रवास ही योजना हाती घेतले आहे. यासाठी केंद्रीय ४० मंत्री मैदानात उतरले आहेत. मतदारसंघ निहाय दौरे करून मोदी सरकारने दिलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या की नाही, नागरिकांच्या समस्य आदी विषयांचा ते आढावा घेत आहेत. या अभियानाअंतर्गत भाजपचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांनी कराड तालुक्यातील भाजप पदाधिकार्यांशी संवाद साधला.
एकेकाळी राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादीचा बनला. जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजण्याऐवढे भाजपचे संघटन कालांतर निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकार्यांच्या जोरावर जिल्हाभर पसरले आहे. स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या सातारा जिल्ह्यात भाजपने आपली पाळेमुळे घट्ट रोवण्यास सुरूवात केली. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर मात्र काँग्रेस विचारधारेच्या सातारा जिल्ह्यात भाजपची घोडदौड सुरु झाली. काँग्रेस, राष्ट्रवादीत दुखावलेले आणि आपल्या सत्ता साम्राज्याला संरक्षण म्हणून अनेकांनी भाजपचे कमळ हातात घेतले.
सध्या सातारा जिल्ह्यात ग्रामपंचायत सदस्यापासून ते राज्य सभेवरील खासदारकीपर्यंत भाजपची वाटचाल सुरू आहे. ही वाट अधिक बळकट करण्यासाठी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात होऊ घातलेली प्रत्येक निवडणूक 'जिंकू किंवा हारू' मात्र ती भारतीय जनता पार्टीच्या झेंड्या खाली लढवली गेली पाहिजे, तरच ग्रामीण भागातील भाजपची ताकद वाढेल, अशी भावना कार्यकर्त्यांत आहे. मात्र, या मागणीला केराची टोपली दाखवून सत्ता भोगासाठी पक्षीय धोरणाचे बाजारीकरण मान्य नसल्याचे अनेक कार्यकर्ते सांगत आहेत.
होऊ घातलेली कराड शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूक व लोकसभा प्रवास योजनेच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांच्या कराड दौर्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून होते. बाजार समितीच्या निवडणुकीत 'कराड दक्षिण भाजप राष्ट्रवादी बरोबर तर उत्तरची भाजप काँग्रेस बरोबर निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जाते. मग आपल्या लोकसभा प्रवास योजनेचा उद्देश कसा सफल होणार? यावर बोलताना तावडे म्हणाले, या निवडणुका झाल्यानंतर पाहू. याचा सरळ सरळ अर्थ आहे की, सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणाशीही युती करू शकते. पक्षीय धोरणाच्या फक्त गप्पा मारल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तावडेंचा ग्रीन सिग्नल...
भाजप रूजवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर दिली आहे. त्यांच्या समोरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर स्थानिक निवडणुकात युती करण्याच्या भुमिकेला स्थानिक भाजप नेत्यांनी दुजोरा दिला आणि यावर पक्षाची ठोस भूमिका मांडण्याऐवजी विनोद तावडे यांनी स्पष्ट स्वरूपात ग्रीन सिंग्नल दिला. त्यामुळे येथे ओठावर एक आणि पोटात एक या उक्तीचा प्रत्यय आल्याने भाजप निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी अस्वस्त दिसून आले. अनेकांनी तावडे यांच्या भुमिकेविषयी आश्चर्य व्यक्त केले.
लोकसभा प्रभारी पदाची जबाबदारी पेलणार?सातारा जिल्हा लोकसभा मतदारसंघाच्या प्रभारी पदाची जबाबदार भाजप नेते डॉ. अतुल भोसले यांच्यावर आहे. जिल्ह्यातील लोकसभा मतदार संघावर भाजपचा झेंडा फडकवण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाय योजना करण्याचे सर्वाधिकार डॉ. भोसले यांना आहेत. जिल्ह्यात होऊ घातलेल्या सर्व प्रकारच्या निवडणूक विधानसभा आणि लोकसभेची रंगीत तालीम आहे. यातील पक्षीय यशावर विधानसभा व लोकसभेचे भवितव्य अवलंबून आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकात भाजपने ग्रामपंचायती जिंकल्याचा दावाही डॉ. भोसले यांनी केला होता. परंतु, कराड उत्तर आणि दक्षिण विधानसभा मतदार संघावर प्रभाव टाकणार्या कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी बरोबर जूळवून घेतल्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे दोनही मतदार संघासह कराड शहरातील भाजप कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. या नाराजीमुळे लोकसभा प्रभारी म्हणून ते जबाबदारी प्रभावीपणे पार पाडतील का? याविषयी चर्चेला उधान आले आहे.
©2024. All Rights Reserved.