ताज्या बातम्या
आधे इधर जाओ...आधे उधर चलो..... || म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो...! . || कृष्णेच्या रणांगणातून बाबांनी काढला पळ. || कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...!. || कराड चावडीवर एकास हग्यामार . || चंदेरीसोनेरी झगमगाट... कराड पोलिसांच्या चावडीवर चर्चांचा घमघमाट. || कृष्णा-कोयना पतसंस्थेसह कराड अर्बन बँक चौकशीच्या फेऱ्यात . || कराड तहसिलदारांच्या आदेशला केराची टोपली. || अबब... लाल मातीचा एक प्रस्ताव खर्ची तब्बल 67 हजार. || कराड आरटीओच्या रेटकार्डची चर्चा जोमात . ||  कराड ‘आरटीओ‘ची तऱ्हा  न्यारी. || कोयना - कृष्णेच्या काठाला जेसीबी पोकलॅन्डचा बोलबाला. || जिल्हाधिकारी साहेब...! कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा. || कृष्णा कारखान्यावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. || घर तिथे संविधान. || कासारशिरंबेतील पुलाच्या उभारणीमुळे दळणवळणाला मिळणार चालना : डॉ. अतुल भोसले. || साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा . || अजय कुमार मिश्रा यांची विकसित भारत संकल्प यात्रा*. || कराड उत्तर मंडलात भाजपच्या निवडी जाहीर......!. || अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा. || बकरीद ईदची सामुदायिक नमाज रद्द. || प्रियांका प्ले हाऊस बंद होणार. || प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम. || प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ. || बेमुदत आंदोलनास पोलीस छावणीचे स्वरूप. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा. || कोयना गृहनिर्माणच्या सदस्यांचे बेमुदत धरणे आंदोलन. || सातारा पालिकेत मुकादमांच्या बोगस सह्यांचा गोलमाल. || गृहनिर्माण सोसायटी फक्त निवासी वापरासाठीच . || कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली. || कोयना गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन संचालकात वादावादी ?. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा. || कृष्णा - कोयनेचा नदीकाठ उध्वस्त. || गौणखनिज माफिया व लोकप्रतिनिधींची भागीदारी. || करा कष्ट ...व्हा भष्ट तरच दिसेल.. सगळं स्पष्ट. || कैसा चलेगा..... बाबा - साहेब...!. || मानकुमरे म्हणतात... त्याला मस्ती आलीय- त्याला सटकून मारला पाहिजे. || कराड बाजार समितीसह उपसमित्यांचाही विकास करू : आ.बाळासाहेब पाटील. || सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा. || आशा शिंदे यांचे निधन. || कराड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सोयीची भूमिका. || भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेस कोलदांडा. || लग्न मिरवणुकीत हवेत गोळीबार. || नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला. || कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत. || कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू. || संभाजीराजे कीर्तिवंत, शूर राजे : धैर्यशील विजयसिंह पाटील  . || राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये. || जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता. || प्लास्टर ऑफ पॅरिसच्या  (पी.ओ.पी.) मूर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई. ||
प्रियांका प्ले हाऊस बंद होणार
  • Aavaj Daily Team
  • Wed 28th Jun 2023 07:14 pm

बंदचा आदेश मात्र, कोयना कॉलनीतील कोयना गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांच्या बेमुदत आंदोलनाच्या १७ व्या दिवशी भर पावसात बेमुदत धरणे आंदोलन सुरुच आहे.

प्रियांका प्ले हाऊस बंद होणार
कराड पालिकेचे आदेश
३० दिवसांची मुदत; बेमुदत आंदोलनाचा १७ वा दिवस


कराड : कोयना कॉलनीतील तक्रारदार आंदोलकांच्या बेमुदत आंदोलनाच्या १७व्या दिवशी कराड नगरपालिका ऍक्शन मोडवर आली आहे. प्रियांका प्ले हाऊस चालकांना ३०दिवसात प्ले हाऊस बंद करून स्थलांतरित करण्याचे आदेश आज दि २८ जून रोजी दिले आहेत. दरम्यान, कोयना कॉलनीतील कोयना गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांच्या बेमुदत आंदोलनाच्या १७ व्या दिवशी भर पावसात बेमुदत धरणे आंदोलन सुरुच आहे.

 प्रियांका प्ले हाऊस चालक ठक्कर यांना कराड नगरपालिकेने काढलेल्या आदेशात म्हंटले आहे की, कोयना सहकारी दूध पुरवठा सेवकांची सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, कराड यांचा ठराव क्र. ७ (४) दि. २० ऑक्टोबर २०२२च्या ठरावामध्ये नमुद असल्याप्रमाणे दि. १ मे २०२३ पासून सदर प्लॉटवर प्रियांका प्ले हाऊस यासाठी नवीन शैक्षणिक प्रवेश घेवू नये व नवीन शैक्षणिक वर्ष सदर ठिकाणी सुरु करणेत येऊ नये, असा ठराव करणेत आलेला आहे. परंतु, आपण अद्यापही ठरावाचे पालन करून प्रियांका प्ले हाऊस बंद केल्याचे दिसून येत नाही. गृह निर्माण संस्थेची परवानगी नसताना आपण प्रियांका प्ले हाऊस सुरू ठेवल्याचे दिसून येते.

तसेच आपण प्लॉट क्र. ६०० ब/२२ मधील मिळकती मध्ये प्ले हाऊस सुरू करण्याकरिता नगरपालिकेची परवानगी / ना-हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. आपण मिळकतीचा वापर विनापरवाना करत आहात. तरी आपल्याला या नोटीसद्वारे कळविण्यात येते की, आपण प्रियांका प्ले हाऊस ३० दिवसांच्या आत बंद करावे.

 कोयना सहकारी दूध पुरवठा संघाचे सेवकांची सहकारी, गृह संस्था मर्यादित, कराड व कराड नगरपालिका, कराड यांच्याकडून आवश्यक असलेल्या परवानग्या घेऊनच प्रियांका प्ले हाऊस सुरु करावे अन्यथा आपल्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा आदेश कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी खंदारे यांनी काढला आहे.

 


पालिकेने हटवले प्ले हाऊसचे बोर्ड

 एवढे वर्ष कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या परवानगी अथवा ना हरकत दाखल्याशिवाय कोयना कॉलनीमध्ये सुरु असलेले बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करण्याचे आदेश कराड नगरपालिकेने पारित केले आहेत. आज दि. २८ रोजी प्रियांका प्ले हाऊसचे सर्व फलक पालिका कर्मचाऱ्यानी हटवले.


बेमुदत आंदोलन सुरूच ठेवणार...
गेली १७ दिवसापासून आमचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज पालिकेने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन प्रियांका प्ले हाऊस बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत ते बंद करण्याचे आदेश चालकांना दिले असल्याचे समजते. आम्हाला याबाबतचा कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही, असे असलेतरी सुद्धा जोपर्यंत प्ले हाऊस बंद होऊन स्थलांतरित होत नाही, तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत.
-आंदोलनकर्ते महिला /पुरुष

 

 



©2024. All Rights Reserved.