ताज्या बातम्या
आधे इधर जाओ...आधे उधर चलो..... || म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो...! . || कृष्णेच्या रणांगणातून बाबांनी काढला पळ. || कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...!. || कराड चावडीवर एकास हग्यामार . || चंदेरीसोनेरी झगमगाट... कराड पोलिसांच्या चावडीवर चर्चांचा घमघमाट. || कृष्णा-कोयना पतसंस्थेसह कराड अर्बन बँक चौकशीच्या फेऱ्यात . || कराड तहसिलदारांच्या आदेशला केराची टोपली. || अबब... लाल मातीचा एक प्रस्ताव खर्ची तब्बल 67 हजार. || कराड आरटीओच्या रेटकार्डची चर्चा जोमात . ||  कराड ‘आरटीओ‘ची तऱ्हा  न्यारी. || कोयना - कृष्णेच्या काठाला जेसीबी पोकलॅन्डचा बोलबाला. || जिल्हाधिकारी साहेब...! कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा. || कृष्णा कारखान्यावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. || घर तिथे संविधान. || कासारशिरंबेतील पुलाच्या उभारणीमुळे दळणवळणाला मिळणार चालना : डॉ. अतुल भोसले. || साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा . || अजय कुमार मिश्रा यांची विकसित भारत संकल्प यात्रा*. || कराड उत्तर मंडलात भाजपच्या निवडी जाहीर......!. || अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा. || बकरीद ईदची सामुदायिक नमाज रद्द. || प्रियांका प्ले हाऊस बंद होणार. || प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम. || प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ. || बेमुदत आंदोलनास पोलीस छावणीचे स्वरूप. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा. || कोयना गृहनिर्माणच्या सदस्यांचे बेमुदत धरणे आंदोलन. || सातारा पालिकेत मुकादमांच्या बोगस सह्यांचा गोलमाल. || गृहनिर्माण सोसायटी फक्त निवासी वापरासाठीच . || कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली. || कोयना गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन संचालकात वादावादी ?. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा. || कृष्णा - कोयनेचा नदीकाठ उध्वस्त. || गौणखनिज माफिया व लोकप्रतिनिधींची भागीदारी. || करा कष्ट ...व्हा भष्ट तरच दिसेल.. सगळं स्पष्ट. || कैसा चलेगा..... बाबा - साहेब...!. || मानकुमरे म्हणतात... त्याला मस्ती आलीय- त्याला सटकून मारला पाहिजे. || कराड बाजार समितीसह उपसमित्यांचाही विकास करू : आ.बाळासाहेब पाटील. || सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा. || आशा शिंदे यांचे निधन. || कराड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सोयीची भूमिका. || भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेस कोलदांडा. || लग्न मिरवणुकीत हवेत गोळीबार. || नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला. || कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत. || कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू. || संभाजीराजे कीर्तिवंत, शूर राजे : धैर्यशील विजयसिंह पाटील  . || राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये. || जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता. || प्लास्टर ऑफ पॅरिसच्या  (पी.ओ.पी.) मूर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई. ||
बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा
  • Aavaj Daily Team
  • Tue 9th May 2023 05:42 pm

पालकमंत्री शंभूराज देसाई कराड दौऱ्यावर असताना येथील शासकीय विश्रामगृहावर कोयना कॉलनीतील महिला व नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडली. यावेळी याप्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रांताधिकारी यांना दिले आहेत. तसा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी कॉलनीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा

कराडच्या कोयना कॉलनीतील नागरिकांची मागणी
पालकमंत्र्यांसमोर मांडली कैफियत 
कराड : 

कराड कोयना कॉलनीतील कोयना सहकारी दुध पुरवठा संघाचे सेवकांची सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. कराड येथे बेकायदेशीर सुरू असलेले प्रियांका प्ले हाऊस बंद करून शिक्षण विभाग, कराड नगरपालिका, पालक, विद्यार्थी व सोसायटी सभासद, रहिवासी यांची फसवणूक केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली.

पालकमंत्री शंभूराज देसाई कराड दौऱ्यावर असताना येथील शासकीय विश्रामगृहावर कोयना कॉलनीतील महिला व नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडली. यावेळी याप्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी प्रांताधिकारी यांना दिले आहेत. तसा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही दिल्या. यावेळी कॉलनीतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 कोयना कॉलनीतील कोयना सहकारी दुध पुरवठा संघाचे सेवकांची सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. कराड या नावाने  दि. १५ मार्च १९७१ साली नोंदणीकृत आहे. या सहकारी गृहनिर्माण सोसायटीचे सुमारे ३४ सभासद आहेत. सोसायटीच्या उपविधीतील कलम व नियम सदर गृहनिर्माण संस्थेचे सर्व सभासद यांचेवर बंधनकारक आहेत. त्यानुसार येथे वास्तव्य करणाऱ्यांना सोसायटीच्या घटनात्मक तरतुदीनुसार येथील जमीन क्षेत्र फक्त निवासी (राहण्यासाठी) वापर करता येणार आहे. अन्य कोणत्याही व्यवसायिक कारणासाठी वापर करता येणार नाही, स्पष्टपणे नमूद केले आहे. सदर सोसायटीचे घटनेतील उपविधी २४ (ब) मधील तरतुदीनुसार “सभासदास / नाममात्र सभासदास मुळ सभासदांच्या संमत्तीने संस्थेच्या परवागीने आणि संस्थेने घालून दिलेल्या अटी व शर्ती यांना पात्र राहून भु-भागावर राहणेचा अधिकार राहील." अशी सोसायटीचा घटनेची तरतूद असल्याचे नागरिकांनी पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले.

 

याशिवाय कोणत्याही शैक्षणिक विभागाकडून लेखी परवागी न घेता सोसायटीत निवासी वापराकरिता असलेल्या राहत्या घरी "प्रियांका प्ले हाऊस" या नावाने व्यवसाय बेकायदेशीररित्या चालू केलेला आहे. सदर प्ले हाऊस चालवताना शैक्षणिक धोरण, नियमावलीची पायमल्ली केली आहे. येथे १०० हुन अधिक मुलांना एकाच खोलीत शिकवले जाते. शैक्षणिक धोरणानुसार कोणत्याही सुविधा येथे नाहीत. एका मुलास सुमारे २० हजाराहून अधिक फी आकारली जात आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी असल्याने सोसायटीत वाढलेली पालकांची वर्दळ, विद्यार्थ्यांचा गोंगाट, वाढते अपघाताचे प्रमाण यामुळे सोसायटीचे शांतता भंग झाली असून येथील वयोवृद्ध नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याचे कैफियत नागरिकांनी मांडली.

  दि. ११ ऑक्टोबर २०२२ रोजी वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये चर्चा होवून सभेचे ठराव नंबर ७/४ नुसार दि. ३० एप्रिल २०२३ पर्यंत प्ले हाऊस दुसरीकडे हालविणेबाबत मुदत दिली. तसेच दि. ०१ मे २०२३ नंतर प्रवेश घेवू नये, असा ठरावही करण्यात आहे. मात्र प्रियांका प्ले हाऊस साठी २०२३-२४ या साला करिता विद्यार्थ्यांना प्रवेश देणे चालू केले आहे. 

अशा आहेत मागण्या...

प्रियांका प्ले हाऊसच्या चालक विमल पंकज ठक्कर यांचे कृत्य पुर्णतः सोसायटीचे सभासदाच्या हिता विरूध्द व सभासदांना उपद्रव होईल असे आहे. ठक्कर यांनी शिक्षण विभाग, विद्यार्थी, पालक, कराड नगरपालिका यांच्यासह सोसायटीची दिशाभूल व फसवणूक केल्या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, सोसायटीच्या घटनेतील तरतुदीनुसार कारवाई करून सभासदत्व रदद् करणेत यावे, सदरचे बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस तातडीने बंद करण्यात यावे, कराड पालिकेला रहिवाशी कर भरून प्ले हाऊसच्या माध्यमातून व्यवसाय कर बुडवला आहे तो वसूल करावा, अशा मागण्याचे निवेदन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.



©2024. All Rights Reserved.