सातारा जिल्ह्याचा महसूल विभाग खाबूगिरीच्या कामात नेहमीच आघाडीवर राहिल्याचे पुन्हा एखदा स्पष्ट झाले आहे. सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या कराड तालुक्यातील गौण खनिजावर दिवसा ढवळ्या महसूल प्रशासनातील लहान मोठया अधिकार्यांना हाताशी धरून माती माफियांकडून दरोडा टाकण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. यावर वस्तुनिष्ठ भाष्य करणारी ‘जिल्हाधिकारी साहेब ... ! कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा’ ही वृत्तमालिका आजपासून .....
जिल्हाधिकारी साहेब .... कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला सामुहिक दरोडा
महसूल विभागाचे कारभारीच माफियांना सामील
लाखो ब्रास लाल मातीची लूट
पराग शेणोलकर
कराड
सातारा जिल्ह्याचा महसूल विभाग खाबूगिरीच्या कामात नेहमीच आघाडीवर राहिल्याचे पुन्हा एखदा स्पष्ट झाले आहे. सातारा जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या कराड तालुक्यातील गौण खनिजावर दिवसा ढवळ्या महसूल प्रशासनातील लहान मोठया अधिकार्यांना हाताशी धरून माती माफियांकडून दरोडा टाकण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. यावर वस्तुनिष्ठ भाष्य करणारी ‘जिल्हाधिकारी साहेब ... कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा’ ही वृत्तमालिका आजपासून ....
कराड तालुक्याला एक स्वतंत्र इतिहास आहे. राज्याच्या राजकारणातही कराडचा मोठा दबदबा राहिला आहे. कृष्णा-कोयनेच्या तिरावर वसलेल्या कराड तालुक्याला नैसर्गिक साधन संपत्तीचे मोठे भांडर आहे. मात्र, हे भांडर जतन करणारे शासनाचे कारभारी माफियांना सामील झाल्याने कराड तालुक्यातील हा नैसर्गिक ठेवा नष्ठ होण्याच्या मार्गावर आहे.
कराडचा महसूल विभाग म्हणजे, माती, मुरूम, दगड आदी गौण खनीज लुटारूंच्या टोळीची गुहाच असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. गेल्या नोव्हेंबर २०२३ पासून बिनधोकपणे महसूल प्रशासनाला मॅनेज करून विनापरवाना कृष्णा-कोयनेच्या काठावर लाल मातीची लुट सुरू आहे. गेल्या चार-पाच महिन्यात लाल मातीवर राजरोसपणे दरोडा टाकत कराड तालुक्यातील कृष्णा-कोयनेच्या नदी पात्रात लाखो ब्रास मातीचे उत्खनन करण्यात आले आहे. सरकारी ‘बाबू’च्या देखरेखी खाली माफियांनी बेकायदा लाल माती उत्खननावर ‘विजय’ प्राप्त केला आहे. या उत्खननात कार्वे-कोडोली, रेठरे, तासवडे आदी गावांचा कृष्णाकाठ उध्वस्त झाला आहे. तर कोयनानदी पात्रही उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे.
......................क्रमशः......................
आमच्याकडे कोणतीही तक्रार नाही, तुम्ही तक्रार करा, भलेही ती निनावी असेलतरी चालेल, अशी उत्तर दस्तरखुद्द तहसीलदार विजय पवार यांनी दिल्याने धक्काच बसला. त्यामुळे तक्रारीशिवाय कराडचा महसूल विभाग कोणतीही कारवाई करत नाही. मग भलेही बेकायदेशीर उत्खनन तलाठी, मंडलधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार आणि तालुक्याचे थोरले कारभारी असलेल्या प्रांताधिकारी यांच्या डोळ्यादेखत सुरू असो असे विदारक चित्र सध्या कराड तालुक्याच्या महसूल विभागात आहे.
©2025. All Rights Reserved.