पोलीस उपविभागीय कार्यालयाने आंदोलनकर्ते व प्रियांका प्ले हाऊस चालकांना नोटिस बजावत आपआपल्या जवळील सक्षम पुरावे घेऊन हजर राहण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, प्ले हाऊस चालक ठक्कर हे सक्षम प्राधिकारणाचे कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरले आहेत. तर आंदोलकांनी आपल्या जवळील सक्षम पुरावे सादर केल्याने प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
प्रियंका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ
पोलीस प्रशासनासमोर सक्षम पुरावे सादर करण्यात अपयश
तक्रारदारांनी केले पुरावे सादर
निबंधकांच्या भूमिकेकडे लक्ष
कराड : कोयना कॉलनीतील तक्रारदार आंदोलकांनी थेट पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर पोलीस प्रशासनाच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. पोलीस उपविभागीय कार्यालयाने आंदोलनकर्ते व प्रियांका प्ले हाऊस चालकांना नोटिस बजावत आपआपल्या जवळील सक्षम पुरावे घेऊन हजर राहण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, प्ले हाऊस चालक ठक्कर हे सक्षम प्राधिकारनाचे कोणतेही ठोस पुरावे सादर करण्यात अपयशी ठरले आहेत. तर आंदोलकांनी आपल्या जवळील सक्षम पुरावे सादर केल्याने प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
कोयना कॉलनीतील कोयना गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांच्या बेमुदत आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चिघळत चालला असल्याने पोलीस प्रशासन अलर्ट झाल्याचे दिसून आले. पोलीस उपविभागीय कार्यालयातून दोनही गटांना नोटीस देऊन आपआपल्या जवळील पुरावे घेऊन बोलावणे करण्यात आले.
संबंधित प्रियांका प्ले हाऊस चालक ठक्कर व तक्रारदार आंदोलकांना आपआपल्या जवळील सर्व कागदपत्रांसह पोलीस उपविभागीय कार्यालयात हजर झाले. यावेळी तक्रारदाराने आपले तक्रार अर्ज, सहकार खात्याची उपविधी, गृहनिर्माण संस्थेने केलेला ठराव, सहकार खात्याने पाठवलेले पत्र आणि शहर पोलिसात केलेल्या तक्रार अर्ज आदी कागदपत्रे समोर ठेवली. दरम्यान प्रियांका प्ले हाऊसच्या चालक ठक्कर यांच्याकडे कोणत्याही सक्षम प्राधिकरणाची मान्यता, नाहरकत दाखला, गृह निर्माण संस्थेची मान्यता आदी कोणतीही कागदपत्रांचे पुरावे म्हणून सादर करण्यात ते अपयशी ठरले. दरम्यान, आम्हाला गृह निर्माण संस्थेचे चेअरमन यांनी तोंडी परवानगी दिली असल्याचे ठक्कर यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सात संचालकांसह सदस्यांनी हरकत घेतली. लेखी पुरावे द्या, अशी मागणी केली.
ठक्कर निरुत्तर...
एवढे वर्ष कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या परवानगी अथवा ना हरकत दाखल्याशिवाय प्ले हाऊस कसे काय चालवू शकता? असा उलट सवाल पोलीस प्रशासनाने ठक्कर यांना विचारला. यावर मात्र ठक्कर नितुत्तर झाले. दरम्यान, उपविधीची प्रत दाखवत यात तरतूद असल्याचे सांगितले. यावर आंदोलकांनी आक्षेप नोंदवला. संस्थेची आदर्श उपविधी मधील उद्दिष्टांची अंमलबजावणी संचालक मंडळ व संस्थाच करू शकते, असा दावा केला.
प्ले हाऊस स्थलांतरित करावे लागणार..
संस्थेच्या आदर्श उपविधीमधील उद्दिष्ठाची अंमलबजावणी करण्यासंबंधातील निर्वाळा उपनिबंधक कराड यांच्याकडे जाऊन लिखित स्वरूपात घेऊन या, अशा सूचना पोलीस प्रशासनाने करत एक दिवसाची मुदत दिली. दरम्यान, प्रियांका प्ले हाऊस चालकांकडे कोणत्याही विभागाच्या कसल्याही पुरावा किंवा नाहरकत दाखले नाहीत. त्यामुळे आपल्या प्ले हाऊसमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेलतर प्रियांका प्ले हाऊस कोयना सोसायटी मधून तातडीने स्थलांतरित करावे लागणार असल्याचे पोलिसांनी ठक्कर यांना सांगितले.
निबंधकांच्या भेटीची औपचारिता...
मुळातच निबंधक कार्यालयाने दि. १६ मे २०२३ च्या पत्राने सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आदर्श उपविधीनुसार येथे वास्तव्यास असणारे सर्व सभासदांना त्यांचे बांधकाम क्षेत्राचा वापर फक्त निवासी वापरा करता येणार आहे. अन्य कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वापर करता येणार नाही. याची तरतूद संस्थेच्या उपविधीमध्ये असल्याचे तक्रारदार व संस्थेस कळवले आहे. आता सहकार विभागाच्या भेटीची व पत्राची फक्त औपचारिता बाकी आहे.
©2024. All Rights Reserved.