कराड: आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्यावतीने आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या पुढाकारातून २०२४ मध्ये राबिवले जात असलेल्या "घर तिथे संविधान" या संकल्पचा शुभारंभ कराड येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला.
घर तिथे संविधान
आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचा संकल्प
कराडमध्ये शुभारंभ
कराड:
आदर्शमाता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानच्यावतीने आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांच्या पुढाकारातून २०२४ मध्ये राबिवले जात असलेल्या "घर तिथे संविधान" या संकल्पचा शुभारंभ कराड येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आला.
"घर तिथे संविधान" हा संकल्प दि.४ जानेवारी ते २६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राबवला जाणारा आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास १०० तालुक्यातील ५०० गावांमध्ये पोहोचून संविधानाबाबत जनजागृती आणि संविधानाची माहिती यावेळी देण्यात येणार आहे.
या संकल्पचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कराड येथील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आले.
यावेळी आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते, माध्यमिक शिक्षक संघाचे राजकुमार लादे, ज्येष्ठ पत्रकार अजिंक्य गोवेकर, सामाजिक कार्यकर्त्या विद्या मोरे, अण्णाभाऊ साठे सामाजिक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे, आरसीपी कमिटीचे, अध्यक्ष इमरान मुजावर, पाडळी केसेचे ग्रा. पं. सदस्य आनंदा बडेकर, संपतराव मोहिते, अशोक मस्के, सविनय कांबळे, उमरफारूक सय्यद, स्वप्निल भिसे, अनिल सावंत, जयवंत माने, रामभाऊ दाभाडे, रमेश सातपुते, विजय वायदंडे, कृष्णत्त मोहिते, विजय गायकवाड सह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
©2024. All Rights Reserved.