कराड शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिगुल वाजला आहे. दि. २७ मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असून दि. २८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होत आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या संवेधनशील व जिल्ह्यात सर्वाधिक मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या बाजार समितीच्या पडद्यामागील राजकीय हालचालीना गती आली आहे. या निवडणुकीत कराड दक्षिण भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले व कराड उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील तर उत्तरेतील भाजप काँग्रेस बरोबर रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ही पक्ष धोरणा विरोधी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांना मान्य नसल्याचे तावडेंच्या पत्रकार परिषदेला दिसून आले.
कराड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सोयीची भूमिका
- तालुक्यातील भाजप नेते नाराज; तावडेंची भूमिका संदिग्ध
कराड : शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपने पक्षीय धोरण बाजुला ठेऊन काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबर जाण्याची तयारी केली आहे. भाजपची ही भूमिका पक्षाच्या मुळावर उठली आहे. याबाबत भाजपचे राष्ट्रीय चिटणीस विनोद तावडे यांना माध्यमांनी छेडले. मात्र, ही निवडणूक पक्षीय चिन्हावर नसल्याचे उपस्थित असलेल्या डॉ. अतुल भोसलेंनी मध्येच सांगितले. त्यावर तावडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या नंतर बघू, असे सांगत या प्रश्नाला बगल दिली. या भूमिकेने कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील भाजप नेते मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ यांच्यासह शहरी भाजप नेत्यांनी नाराजी व्यक्त केली.
कराड शेती उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिगुल वाजला आहे. दि. २७ मार्चपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत असून दि. २८ एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होत आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या संवेधनशील व जिल्ह्यात सर्वाधिक मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या बाजार समितीच्या पडद्यामागील राजकीय हालचालीना गती आली आहे. या निवडणुकीत कराड दक्षिण भाजपचे नेते डॉ. अतुल भोसले व कराड उत्तरचे राष्ट्रवादीचे आमदार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील तर उत्तरेतील भाजप काँग्रेस बरोबर रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे ही पक्ष धोरणा विरोधी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांना मान्य नसल्याचे तावडेंच्या पत्रकार परिषदेला दिसून आले.
लोकसभा पक्ष चिन्हावर तर...
विनोद तावडे यांनी माध्यमांशी बोलताना २०२४ साठी सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढवण्यासाठी आमचा विशेष प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. शिवसेनेकडील जी हिंदुत्ववादी मते आहेत, ती मते भाजपकडे खेचण्यासाठी येथील कार्यकर्त्यांना परिश्रम घ्यावे लागतील असेही सांगितले. त्यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी एका बाजूला तुम्ही हे उद्दिष्ट ठेवले असताना बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र पक्ष विरोधी भूमिकेकडे त्यांचे लक्ष वेधले. त्यावर तावडे काय बोलणार? याची माध्यमांना प्रतिक्षा असतानाच डॉ. अतुल भोसले यांनी मध्येच ही सहकारातील निवडणूक आहे. ही निवडणूक चिन्हावर नसते असे सांगितले. त्याच सुरात सुर मिसळत विनोद तावडेंनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर बोलू असे सांगत प्रश्नाला बगल दिली.परंतु, तेथे उपस्थित असणाऱ्या कराड तालुक्यातील भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी स्पष्ट दिसून आली.
©2024. All Rights Reserved.