दि. १२ जूनपासून कोयना गृह निर्माण संस्थेचे सदस्यांनी कोयना कॉलनीत प्ले हाऊसच्या मार्गावर बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ केला. यावेळी बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा, प्ले हाऊस स्थलांतरित करा या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.
बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा
कोयना गृह निर्माणचे सदस्य आक्रमक; बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ
जोपर्यंत प्ले हाऊस स्थलांतरित होत नाही तोपर्यंत माघार नाही
कराड:
कराड येथील कोयना गृह निर्माण संस्थेच्या आदर्श उपविधीचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे सुरू असलेले प्रियांका प्ले हाऊस तात्काळ बंद करून स्थलांतरित करण्याची मागणी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह शासनाच्या सर्व विभागांना केली आहे. मात्र, गेल्या महिनाभरात यावर कोणताही कार्यवाही झाली नसल्याने दि. १२ जूनपासून कोयना गृह निर्माण संस्थेचे सदस्यांनी कोयना कॉलनीत प्ले हाऊसच्या मार्गावर बेमुदत धरणे आंदोलनास प्रारंभ केला.
यावेळी बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा, प्ले हाऊस स्थलांतरित करा या घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला.
निवेदनात म्हंटले आहे की, कोयना सहकारी दूध पुरवठा संघाचे सेवकांची कोयना सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित कराड या गृहनिर्माण संस्थेच्या आदर्श उपविधीची पायमल्ली करून गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेले प्रियांका प्ले हाऊस सुरू आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई, शिक्षणमंत्री यांच्यासह संबंधीत सर्व शासकीय विभागांना निवेदन दिले, स्मरणपत्र दिली आहेत.
सहकार विभागाने या प्रकरणी गृहनिर्माण सोसायटीच्या आदर्श उपविधीच्या तरतुदीनुसार इथल्या सदनिकांचा वापर निवासी रहिवासासाठी करावयाचा असल्याचे लेखी कळवले आहे. असे असतानाही पालिका प्रशासन, शिक्षण विभाग, महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन यादी विभागांनी ठोस कारवाई केलेली नाही. उलट बेकायदेशीर, गृहनिर्माण सोसायटीच्या आदर्श उपविधीची पायमल्ली करण्यास व कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यास खतपाणी घालत आहेत. या निषेधार्थ व कोयना कॉलनीतील बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस कायमस्वरूपी बंद करून स्थलांतरित होत नाही तोपर्यंत प्ले हाऊसकडे जाणाऱ्या मार्गावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
अशा आहेत मागण्या...- कोयना गृहनिर्माण संस्थेच्या आदर्श उपविधीचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे राहत्या निवासस्थानी सुरू असलेले प्रियांका प्ले हाऊस तातडीने बंद करून स्थलांतरित करण्यात यावे.
- गृहनिर्माण गृहनिर्माण संस्थेच्या आदर्श उपविधीचे उल्लंघन करणे, सभासदांच्या वारस नोंदी घेण्यास टाळाटाळ करणे, सभासदांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणे, संस्थेच्या कामकाज मनमानीपणे करणे, संचालक तसेच सभासदांवर दादागिरी, गुंडशाही करणारे चेअरमन शिवाजीराव चव्हाण यांना तातडीने पदावरून हटवण्यात यावे.
- संस्थेचे सभासद त्यांच्या जीविकास धोका असल्या संदर्भातील तक्रार देऊनही पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही, सदर प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी.
- मृत सभासदांच्या वारस नोंदीसाठी करण्यात आलेले अर्ज तातडीने मंजूर करून वारस नोंदी घेण्यात याव्यात.
आंदोलनास वाढता पाठिंबा...
कोयना कॉलनीतील गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी आपल्या न्यायिक मागणीसाठी केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनास येथील नगरसेवक किरण पाटील यांच्यासह नागरिकांनी भेट दिली. आंदोलनकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. आपले आंदोलन हे कायद्याला धरून असल्याचे सांगत आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.
पालकांना आवाहन....
प्रियांका प्ले हाऊसमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी व पालकांची गैरसोय करण्याचा आमचा हेतू नाही. उलट या प्ले हाऊसमुळे आम्हा स्थानिक नागरिकांना होत असलेल्या त्रासाचा ही पालकांनी विचार करून येथील प्ले हाऊस स्थलांतरित झाल्यानंतर आपले पाल्य प्ले हाऊसला पाठवावे, असे कोयना कॉलनीचे सदस्य व आंदोलनकर्ते म्हणून आवाहन करत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
©2024. All Rights Reserved.