सामुदायिक नमाज (प्रार्थना) पावसाळी वातावरणामुळे होणार नाही. त्यामुळे शहर व परिसर तसेच ग्रामीण भागातील मूस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर येऊ नये, असे आवाहन
बकरीद ईदची सामुदायिक नमाज रद्द
कराडच्या शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह यांच्याकडून जाहीर
कराड: कराडच्या ईदगाह मैदानावर बकरीद ईद निमित्त सामुदायिक नमाज (प्रार्थना) पावसाळी वातावरणामुळे होणार नाही. त्यामुळे शहर व परिसर तसेच ग्रामीण भागातील मूस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर येऊ नये, असे आवाहन शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह कराड यांच्याकडून करण्यात आले आहे.
कराड शहर तसेच ग्रामीण भागातील सर्व मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर न येता आपआपल्या नजीकच्या मस्जिदमध्ये नमाज अदा करावी. पावसाचे वातावरण असल्यामुळे गुरुवार दि.२९ जून रोजी ईद उल- अजहा (बकरीद ईद) ईदची नमाज "ईदगाह" मैदानावर होणार नाही. त्यामुळे मूस्लिम बांधवानी ईदगाह मैदानावर येण्याचा प्रयत्न करू नये, अशी विनंती सर्व मुस्लिम बांधवाना शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह, कराड यांच्याकडून करण्यात आली आहे.
©2024. All Rights Reserved.