ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, त्याच सुपुत्राच्या कराड तालुक्यात वाळू-माती माफियांनी उच्छाद घालत जीवदायिनी ठरलेल्या कृष्णा-कोयनेच्या थानाला दात लावण्याचे काम सुरू केले आहे. या माफियांनी तिन्ही विधानसभा मतदार संघातील नेते, लोकप्रतिनिधी आपल्या पदरी ठेवल्याने शासन नियमात व शासकीय कर भरून प्रामाणिक, कष्टकरी व्यावसायीकांवर करा कष्ट ...व्हा भष्ट, असं म्हणायची वेळ आली आहे.
करा कष्ट ...व्हा भष्ट
तरच दिसेल.. सगळं स्पष्ट
चव्हाण साहेबांच्या तालुक्यात लोकप्रतिनिधींची माफियांबर पाती
पराग शेणोलकर
कराड :
रेवा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी
एकपणाचे भरते पाणी, मातीच्या घागरी...
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा ||
जय जय महाराष्ट्र माझा,
गर्जा महाराष्ट्र माझा ...!
आज महाराष्ट्र दिन.…
ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, त्याच सुपुत्राच्या कराड तालुक्यात वाळू-माती माफियांनी उच्छाद घालत जीवदायिनी ठरलेल्या कृष्णा-कोयनेच्या थानाला दात लावण्याचे काम सुरू केले आहे. या माफियांनी तिन्ही विधानसभा मतदार संघातील नेते, लोकप्रतिनिधी आपल्या पदरी ठेवल्याने शासन नियमात व शासकीय कर भरून प्रामाणिक, कष्टकरी व्यावसायीकांवर करा कष्ट ...व्हा भष्ट, असं म्हणायची वेळ आली आहे.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही समाजव्यवस्थारुपी रथाची दोन चाके आहेत. दोन्ही चाके सरळ चालली तर विकासरूपी कलश प्रत्येक घरावर आणि कळस ग्राममंदिरावर चढणार म्हणजे चढणार. ९०च्या दशकपर्यंत ही दोन्ही चाके सरळ होती. काळानुसार कधी प्रशासनाचे तर कधी लोकप्रतिनिधीचे चाक अर्थरूपी गाळात रुतत गेले.
पैश्यातून सत्ता - सत्तेतून पैसा... पैशातून मनाजोगी जागा आणि जागेतून मनाजोगा पैसा... हे समीकरण दोन्ही बाजूला चिकटले. या चिकटाचिकटीने विकासरूपी कृष्णा - कोयनेचा काठ आकसत गेला. तू व्हय म्हणं... मी नाय म्हणतो... कर तुला काय करायचे ते... या भूमिकेने कृष्णा - कोयनेचा काठ उद्धवस्त झाला आहे.
सध्या सुरु असलेला वारेमाप आणि बेसुमार माती व वाळू उपशाने राहिला सुरलेला नदीकाठही ओरबाडण्याचे काम राजरोसपणे सुरु आहे. अशा परिस्थितीत समाजव्यवस्थारुपी रथाची दोनही चाके खोल गाळात रुतली आहेत. माफिया, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या साखळीत गौण खनिजाची अक्षरशः लूट सुरु आहे.
बाबा- साहेबांच आणि त्यातून उरलं तर माझं तेवढं भागवं. अशी वृत्ती कराड कृष्णा-कोयनेच्या काठावर वाढली-विस्तारली आहे. हा विस्तार नंतर विविध निवडणुकीत अनेकांनी पाहिला. याच विस्ताराने आज कराडचे राजकारण व्यापले आहे. प्रामाणिक - कष्टकरी लोकसेवक आणि सर्वसामान्य माणूस या मुख्य प्रवाहातून बाजूला सरकत काठावर जाऊन पडला आहे.
नदी काठचा शेतकरी व प्रामाणिकपणे गौण खनिज व्यवसाय करणाऱ्यांच्या मुंड्या मुरगळणारे आपल्या लाडक्या नेत्यांचे वाढदिवस फलक लावणारे समाजसेवक- उद्योजक म्हणून नावारुपाला आले आहेत. या कथित बंगाळ्यावाल्यानी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा चिखुल केला आहे. या चिखलात नेते, लोकप्रतिनिधी अर्थरूपी लेंडुक शोधण्यात धन्यता मानत आहेत.
आया मौसम.. थंडे...थंडे...डर्मिकुल का...
सोमवारी अनेकजण महाराष्ट्र गीत गळा सुकेपर्यंत म्हणतील. आदरणीय चव्हाणसाहेबांच्या आठवणी अर्थरूपी सहाणेवर उगळतील. उगळलेले ते चंदन सर्वांगाला फासतील... आणि म्हणतील. आया मौसम.. थंडे...थंडे...डर्मिकुल का... किंवा म्हणतील, मूफत का चंदन...घिस मेरे नंदन.
ते काहीही म्हणू... करा कष्ट... अन व्हा भष्ट, हे वाक्य त्रिकालबाधित सत्य म्हणून प्रामाणिक कार्यकर्ते, व्यावसायिक यांच्या कपाळी गोंदलेय. त्यातून सुटका नाही.
म्हणा,
करा कष्ट ...व्हा भष्ट,
तरच दिसेल.. सगळ स्पष्ट.
चव्हाणसाहेब... पुन्हा जन्माला या.
महाराष्ट्रात लोप पावत चाललेली यशवंत विचारधारा, सर्वसामान्यांची मुस्कटदाबी, लोकप्रतिनिधींची समाजाबद्दल बेबंधकी, समाज व्यवस्थेचे विद्रूपीकरण आणि माफियांकरवी गिळंकृत होत चाललेला कृष्णा-कोयनेचा काठ वाचवण्यासाठी चव्हाणसाहेब... पुन्हा जन्माला या, आपण पुन्हा जन्मला या...!
आवाहन...
नागरिकांनी आपल्या विभागातील समस्या, गोपनीय माहिती बिनधोकपणे आम्हाला 9403944323 या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी. आपले नाव गोपनीय राहिल, याची हमी आम्ही देतो. समाजातील बेबंधशाही संपुष्टात आणण्यासाठी पुढे या. आपण दिलेल्या माहितीची खातर जमा करून प्रसिद्ध केली जाईल.
- आवाज डेली टीम.
क्रमशः
भाग-२
©2024. All Rights Reserved.