ताज्या बातम्या
आधे इधर जाओ...आधे उधर चलो..... || म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो...! . || कृष्णेच्या रणांगणातून बाबांनी काढला पळ. || कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...!. || कराड चावडीवर एकास हग्यामार . || चंदेरीसोनेरी झगमगाट... कराड पोलिसांच्या चावडीवर चर्चांचा घमघमाट. || कृष्णा-कोयना पतसंस्थेसह कराड अर्बन बँक चौकशीच्या फेऱ्यात . || कराड तहसिलदारांच्या आदेशला केराची टोपली. || अबब... लाल मातीचा एक प्रस्ताव खर्ची तब्बल 67 हजार. || कराड आरटीओच्या रेटकार्डची चर्चा जोमात . ||  कराड ‘आरटीओ‘ची तऱ्हा  न्यारी. || कोयना - कृष्णेच्या काठाला जेसीबी पोकलॅन्डचा बोलबाला. || जिल्हाधिकारी साहेब...! कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा. || कृष्णा कारखान्यावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. || घर तिथे संविधान. || कासारशिरंबेतील पुलाच्या उभारणीमुळे दळणवळणाला मिळणार चालना : डॉ. अतुल भोसले. || साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा . || अजय कुमार मिश्रा यांची विकसित भारत संकल्प यात्रा*. || कराड उत्तर मंडलात भाजपच्या निवडी जाहीर......!. || अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा. || बकरीद ईदची सामुदायिक नमाज रद्द. || प्रियांका प्ले हाऊस बंद होणार. || प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम. || प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ. || बेमुदत आंदोलनास पोलीस छावणीचे स्वरूप. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा. || कोयना गृहनिर्माणच्या सदस्यांचे बेमुदत धरणे आंदोलन. || सातारा पालिकेत मुकादमांच्या बोगस सह्यांचा गोलमाल. || गृहनिर्माण सोसायटी फक्त निवासी वापरासाठीच . || कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली. || कोयना गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन संचालकात वादावादी ?. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा. || कृष्णा - कोयनेचा नदीकाठ उध्वस्त. || गौणखनिज माफिया व लोकप्रतिनिधींची भागीदारी. || करा कष्ट ...व्हा भष्ट तरच दिसेल.. सगळं स्पष्ट. || कैसा चलेगा..... बाबा - साहेब...!. || मानकुमरे म्हणतात... त्याला मस्ती आलीय- त्याला सटकून मारला पाहिजे. || कराड बाजार समितीसह उपसमित्यांचाही विकास करू : आ.बाळासाहेब पाटील. || सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा. || आशा शिंदे यांचे निधन. || कराड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सोयीची भूमिका. || भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेस कोलदांडा. || लग्न मिरवणुकीत हवेत गोळीबार. || नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला. || कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत. || कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू. || संभाजीराजे कीर्तिवंत, शूर राजे : धैर्यशील विजयसिंह पाटील  . || राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये. || जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता. || प्लास्टर ऑफ पॅरिसच्या  (पी.ओ.पी.) मूर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई. ||
कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली
  • Aavaj Daily Team
  • Tue 16th May 2023 07:15 pm

चेअरमन शिवाजी चव्हाण हे जाणीवपूर्वक सभासदांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणून मनमानी कारभार करत आहेत. हुकूमशाही वृत्तीने सहकारी सेवा सोसायटीमध्ये कारभार हाकत आहेत. याला आमचा ठाम विरोध असल्याचे सांगत स्थानिक नागरिक व सदस्यांनी मोठा गोंधळ घातला. यावेळी पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा वाद टळला.

कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली

चेअरमन व सभासदांना जोरदार खंडाजंगी

मृत सभासदांच्या वारसांना नाकारला प्रवेश

जाणीवपूर्वक रोखली वारस नोंद; सचिवांकडून कबुली

कराड:

कोयना कॉलनीतील प्रियंका प्ले हाऊस बंद करण्याचा ठराव रद्द करून नव्याने मान्यता देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेला स्थानिक नागरिक व गृहनिर्माण सोसायटीच्या सदस्यांनी ठाम विरोध केला. सभेस मृत सभासदांच्या वारसांना प्रवेश नाकारल्याने झालेल्या गोंधळात सभा रद्द करण्यात आली. यावेळी चेअरमन शिवाजी चव्हाण आणि सभासदांच्या वारसांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. 

दरम्यान,  मृत सभासदांच्या वारसांचे सभासद नोंदणी करता सोसायटीकडे तीन महिन्यांपूर्वी अर्ज आल्याचे सचिव नितीन सांडगे यांनी मान्य केले. मग सभासद नोंदणी का करून घेण्यात आली नाही यावर मात्र ते निरुत्तर झाले. त्यामुळे चेअरमन शिवाजी चव्हाण हे जाणीवपूर्वक सभासदांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणून मनमानी कारभार करत आहेत. हुकूमशाही वृत्तीने सहकारी सेवा सोसायटीमध्ये कारभार हाकत आहेत. याला आमचा ठाम विरोध असल्याचे सांगत स्थानिक नागरिक व सदस्यांनी मोठा गोंधळ घातला. यावेळी पोलीस प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा वाद टळला.

कोयना सहकारी दुध पुरवठा संघाच्या सेवकांची सहकारी गृहनिर्माण संस्थेची दि. १६ मे रोजी विशेष सभा येथील आशीर्वाद बंगल्यात आयोजित केली होती. येथे सुरू असलेले प्रियांका प्ले हाऊस हे बंद करण्यात यावे, या मागणीसाठी येथील रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांपर्यंत थेट तक्रारी केल्या आहेत. शिवाय प्रशासनाकडेही धाव घेतली आहे. त्या अनुषंगाने आजच्या  सभेला विशेष महत्त्व होते. या सभेमध्ये संबंधित प्ले हाऊसला स्थलांतरित करण्याचा ठराव रद्द करून नव्याने मान्यतेचा ठराव देण्यासंबंधी विचार विनिमय होणार होता, यालाच स्थानिक नागरिकांसह सभासदांचा मोठा विरोध होता. या अनुषंगाने गेल्या आठ दिवस या विषयावर सातत्याने वाद, विवाद, चर्चा आणि प्रबोधन अशा पद्धतीचा मोहीम सुरू होती.

 दरम्यान, सोसायटीचे संचालक पारवे व चेअरमन शिवाजी चव्हाण यांच्यात प्ले हाऊसच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला पोहोचला. एकमेकांना शिवीगाळ व धक्काबुक्की झाल्याच्या चर्चेने वातावरण अधिकच चिघळले. या पार्श्वभूमीवर होत असलेल्या सभेला पोलीस बंदोबस्त देण्यात आला.

 

 सभेच्या वेळेत कॉलनीतील नागरिक व सदस्यांनी मोठी गर्दी केली होती. सुरुवातीपासूनच पोलीस प्रशासनाने आपली भूमिका बजावत सोसायटीची ही सभा सोसायटीतील नागरिक, सभासद की संचालक यापैकी कोणाची आहे, याची खातरजमा केली. दरम्यान, काही सभासदांनी आम्ही सदस्य आहे. आमचे वडील सदस्य होते. त्यांच्या मृत्यूनंतर सदस्य नोंदणीसाठी आम्ही अर्ज केले आहेत. सोसायटीची फी भरतो. सोसायटीच्या सर्व अटी-शर्तीचे आम्ही पालन केलेले आहे, असे असतानाही आम्हाला या सभेमध्ये प्रवेश नाकारण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त करत प्रवेशाची मागणी केली. यावेळी मात्र चेअरमन चव्हाण यांनी फक्त नोंदणी असलेल्या सभासदांना प्रवेश दिला जाईल, अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही, अशी भूमिका घेताच वादाला तोंड फुटले.

 उपस्थित नागरिकांनी आम्ही मूळ फाउंडर मेंबर आहे. आमचे सदस्य मृत झाले असलेतरी आम्ही वारसा हक्काने सदस्य आहोत. तसे नोंदणीची मागणी ही आम्ही तीन महिन्यापूर्वी केली आहे. याची खातरजमा करून मृत सदस्यांच्या वारसांना या सभेमध्ये प्रवेश द्यावा, अशी मागणी लावून धरली. मात्र, अशा कोणालाही प्रवेश मिळणार नाही, अशी भूमिका चेअरमन यांनी पुन्हा घेतल्याने वाद चिघळला. त्यानंतर सोसायटीमधील अनेक बारीक-सारीक वाद, विवाद, तंटे भ्रष्टाचार यावर एकमेकांवर चिखल फेक करण्यात आली. पोलिसांनी सातत्याने मध्यस्थीची भूमिका बजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, चेअरमन आपल्या भूमिकेवर ठाम तर सदस्य सभासद व वारस आपल्या भूमिकेवर ठाम त्यामुळे अखेर ही सभा रद्द करण्यात आल्याची घोषणा सचिव  सांडगे यांनी केली.

महिला आक्रमक; पोलिसांची कडक भूमिका

नोंदणीकृत गृहनिर्माण सोसायटीच्या उपविधीचे उल्लंघन करून कोणत्याही परिस्थितीमध्ये प्ले हाऊस सुरू होऊ देणार नाही. चेअरमनचा मनमानी कारभार चालणार नाही. सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करा आदी विविध मागण्या करत सभासद व स्थानिक नागरिक महिला व पुरुषांनी मोठा गोंधळ घातला. अखेर पोलिसांनी कडक भूमिका घेत सर्वांना आपापल्या घरी जाण्याची सक्त ताकीद दिली.


 

बाहेरची लोक बोलवून दहशत माजवण्याचा प्रयत्न

कोयना दूध सेवकांच्या गृहनिर्माण संस्थेच्या विशेष सभेदरम्यान चेअरमन शिवाजी चव्हाण यांनी स्थानिक नागरिक,  सोसायटी सदस्य वगळता अन्य काही बाहेरील लोकांना तेथे बोलवून स्थानिक नागरिक, महिला व पुरुष सदस्य तसेच नागरिकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यापासून आमच्या जीवितास धोका असल्याची लेखी तक्रार सोसायटीतील नागरिकांनी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.

 

 



©2024. All Rights Reserved.