संबंधित गृहनिर्माण सोसायटी ज्या विभागाकडे नोंदणीकृत आहे, त्या कराड उपनिबंधक विभागाने सोसायटीसह तक्रारदारांना पत्रव्यवहार करून सोसायटीची आदर्श उपविधी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळासह सर्व सभासदांवर बंधनकारक असल्याचे पत्राने कळवले आहे.
गृहनिर्माण सोसायटी फक्त निवासी वापरासाठीच
: उपनिबंधक संदीप जाधव
- कोयना कॉलनीतील प्रियांका प्ले हाऊस स्थलांतरित करावे लागणार
कराड:
कोयना कॉलनीत कोयना सहकारी दुध पुरवठा संघाचे सेवकांची सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. कराड या गृहनिर्माण संस्थेस सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आदर्श उपविधीतील तरतुदी गृहनिर्माण संस्थेच्या सर्व सभासदांवर बंधनकारक आहेत. त्यानुसार येथे वास्तव्यास असणारे सर्व सभासदांना त्यांचे बांधकाम क्षेत्राचा वापर फक्त निवासी वापरा करीता करता येणार असल्याचे उपनिबंधक संदीप जाधव यांनी सोसायटी चेअरमन व तक्रारदार यांना कळवल्याने उपविधीचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे सुरू असलेले प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ झाली असून प्ले हाऊस स्थलांतरित करावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कराड कोयना कॉलनीतील कोयना सहकारी दुध पुरवठा संघाचे सेवकांची सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. कराड येथे बेकायदेशीर सुरू असलेले प्रियांका प्ले हाऊस बंद करून शिक्षण विभाग, कराड नगरपालिका, पालक, विद्यार्थी व सोसायटी सभासद, रहिवासी यांची फसवणूक केल्या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली. तसेच संबंधित मंत्रालये, शासकीय विभागांना पत्रव्यवहार करण्यात आला होता.
संबंधित गृहनिर्माण सोसायटी ज्या विभागाकडे नोंदणीकृत आहे, त्या कराड उपनिबंधक विभागाने सोसायटीसह तक्रारदारांना पत्रव्यवहार करून सोसायटीची आदर्श उपविधी चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळासह सर्व सभासदांवर बंधनकारक असल्याचे पत्राने कळवले आहे.
निबंधक विभागाने पत्रात म्हंटले आहे की, कोयना सहकारी दुध पुरवठा संघाचे सेवकांची सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. कराड यांना कळवण्यात येते की, सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या आदर्श उपविधीतील तरतुदी या संस्थेच्या सर्व सभासद यांचेवर बंधनकारक आहेत. त्यानुसार येथे वास्तव्यास असणारे सर्व सभासदांना त्यांचे बांधकाम क्षेत्राचा वापर फक्त निवासी वापरा करीता करता येणार आहे, अन्य कोणत्याही व्यावसायिक कारणासाठी वापर करता येणार नाही, याची तरतुद संस्थेच्या उपविधी मध्ये नमुद आहे. आपले तक्रारी अर्जातील तक्रारी नुसार आपले संस्थेच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेले “प्रियांका प्ले हाऊस" हे बंद करणे बाबत विनंती केलेली आहे. सदर मुद्दास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, सदर बाबत कारवाई करणे ही बाब महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील तरतुदीनुसार व संस्थेच्या उपविधीतील तरतुदीनुसार संस्थेच्या समितीचे अधिकार कक्षेतील आहे. त्यामुळे सदर बाबत कारवाई करणेचे सर्व अधिकार संस्थेस आहेत.
त्यामुळे गृहनिर्माण संस्थेने केलेल्या ठरावानुसार येथील प्ले हाऊस स्थलांतरित करावे लागणार आहे. सहकार खात्याने दिलेल्या निर्वाळ्याने तक्रारदार सोसायटीच्या सदस्यांना पहिल्या टप्प्यात यश मिळाले आहे.
चुकीच्या कामावर प्रकाश झोत...
कोयना गृहनिर्माण सोसायटीमध्ये बेकायदेशीर व गृहनिर्माण सोसायटीच्या उपविधीचे उल्लंघन करून सुरू असलेले प्रियांका प्ले हाऊस हे तातडीने बंद करण्यात यावे, अशी मागणी सभासदांनी केली. यावेळी या बेकायदेशीर प्ले हाऊसचा पाठीराखा म्हणून उभे असलेले सोसायटीचे चेअरमन शिवाजी चव्हाण यांना सभासदांच्या संतापाला सामोरे जाण्याची वेळ आली. अशा परिस्थितीतही चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेला दस्तूर खुद्द उपनिबंधक कार्यालयाने आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे सहकार खात्याच्या आदेशानुसार आदर्श उपविधी चे पालन करत सोसायटीमधील बेकायदेशीर प्ले हाऊस बंद करण्याशिवाय चेअरमन व संचालक मंडळ समोर पर्याय नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आदेश म्हणजे चेअरमन यांच्या चुकीच्या कामकाजावर प्रकाश झोत टाकणारा असाच आहे.
©2024. All Rights Reserved.