ताज्या बातम्या
आधे इधर जाओ...आधे उधर चलो..... || म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो...! . || कृष्णेच्या रणांगणातून बाबांनी काढला पळ. || कराडच्‍या चावडीत...नुसताच धुर...!. || कराड चावडीवर एकास हग्यामार . || चंदेरीसोनेरी झगमगाट... कराड पोलिसांच्या चावडीवर चर्चांचा घमघमाट. || कृष्णा-कोयना पतसंस्थेसह कराड अर्बन बँक चौकशीच्या फेऱ्यात . || कराड तहसिलदारांच्या आदेशला केराची टोपली. || अबब... लाल मातीचा एक प्रस्ताव खर्ची तब्बल 67 हजार. || कराड आरटीओच्या रेटकार्डची चर्चा जोमात . ||  कराड ‘आरटीओ‘ची तऱ्हा  न्यारी. || कोयना - कृष्णेच्या काठाला जेसीबी पोकलॅन्डचा बोलबाला. || जिल्हाधिकारी साहेब...! कृष्णा-कोयनेच्या काठावर पडला दरोडा. || कृष्णा कारखान्यावर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. || घर तिथे संविधान. || कासारशिरंबेतील पुलाच्या उभारणीमुळे दळणवळणाला मिळणार चालना : डॉ. अतुल भोसले. || साताऱ्यात विकसित भारत संकल्प यात्रा आढावा . || अजय कुमार मिश्रा यांची विकसित भारत संकल्प यात्रा*. || कराड उत्तर मंडलात भाजपच्या निवडी जाहीर......!. || अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा. || बकरीद ईदची सामुदायिक नमाज रद्द. || प्रियांका प्ले हाऊस बंद होणार. || प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम. || प्रियांका प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ. || बेमुदत आंदोलनास पोलीस छावणीचे स्वरूप. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हाऊस बंद करा. || कोयना गृहनिर्माणच्या सदस्यांचे बेमुदत धरणे आंदोलन. || सातारा पालिकेत मुकादमांच्या बोगस सह्यांचा गोलमाल. || गृहनिर्माण सोसायटी फक्त निवासी वापरासाठीच . || कोयना गृहनिर्माण संस्थेची विशेष सभा सभासदांनी उधळली. || कोयना गृहनिर्माण सोसायटीच्या चेअरमन संचालकात वादावादी ?. || बेकायदेशीर प्रियांका प्ले हौऊस बंद करा. || कृष्णा - कोयनेचा नदीकाठ उध्वस्त. || गौणखनिज माफिया व लोकप्रतिनिधींची भागीदारी. || करा कष्ट ...व्हा भष्ट तरच दिसेल.. सगळं स्पष्ट. || कैसा चलेगा..... बाबा - साहेब...!. || मानकुमरे म्हणतात... त्याला मस्ती आलीय- त्याला सटकून मारला पाहिजे. || कराड बाजार समितीसह उपसमित्यांचाही विकास करू : आ.बाळासाहेब पाटील. || सातारा जिल्ह्यात खतांचा मुबलक साठा. || आशा शिंदे यांचे निधन. || कराड बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची सोयीची भूमिका. || भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेस कोलदांडा. || लग्न मिरवणुकीत हवेत गोळीबार. || नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी आवश्यक पाऊले उचला. || कराड व मलकापूरचा स्वच्छ पाणी प्रश्न विधानसभेत. || कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ हे जागतिक दर्जाचे विद्यापीठ करू. || संभाजीराजे कीर्तिवंत, शूर राजे : धैर्यशील विजयसिंह पाटील  . || राजकीय टोलवा-टोलवीमध्ये कराड-चिपळूण रेल्वे मार्ग बारगळू नये. || जयवंत शुगर्सच्या १२ व्या गळीत हंगामाची उत्साहात सांगता. || प्लास्टर ऑफ पॅरिसच्या  (पी.ओ.पी.) मूर्ती बनविणे व विक्री करण्यास मनाई. ||
अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा
  • Aavaj Daily Team
  • Sat 22nd Jul 2023 02:27 pm

अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून केलेप्रकरणी कराड सत्र न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा, पोक्सो कायदयाअंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व १ लाख रूपयाची दंडाची शिक्षा सुनावली.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून प्रकरणी एकास फाशीची शिक्षा

 कराड सत्र न्यायालयाचा निकाल

कराड:
       संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या  (रुवले) सुतारवाडी तालुका पाटण जिल्हा सातारा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून केलेप्रकरणी कराड सत्र न्यायालयात सुनावणी झाली. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीस फाशीची शिक्षा, पोक्सो कायदयाअंतर्गत २० वर्षे सश्रम कारावास व १ लाख रूपयाची दंडाची शिक्षा सुनावली. संतोष चंद्रु थोरात (वय ४१)व रा. सुतारवाडी (रूवले) ता. पाटण जि. सातारा असे शिक्षा प्राप्त युवकाचे नाव आहे.

पिडीत अल्पवयीन मुलगी ही ८ वर्षापेक्षा कमी वयाची आहे, हे माहीत असताना सुध्दा चॉकलेटचे आमिष व खेळविणेचे उद्देशाने फुस लावुन जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच तिचा गळा दाबुन हत्या केली. तिचे प्रेत पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने तेथेच असलेल्या ओघळीत, घाणेरीचे झुडपात ७० फुटखोल लपवुन ठेवले. 

 ढेबेवाडी पोलीस स्टेशनला या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता. तपासी अधिकारी ढेबेवाडी पोलीस स्टेशन सहा. पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी आपल्या टीमसह रूवले तेथील नथूराम सुतार यांचे घरावरील सीसी टीव्ही फुटेजच्या सहाय्याने तपास केला. या प्रकरणी वैदयकीय अधिकारी यांनी दिलेली साक्ष व डी. एन. ए. अहवाल अहवाल, तपास कामात प्राप्त महत्वाचे पुरावे आदी बाबी महत्व पुर्ण ठरल्या. 

यामध्ये फिर्यादी पक्षातर्फे एकूण ३३ साक्षीदार तपासले. तसेच बचावपक्षाने आरोपीस साक्षीदार म्हणून तपासले.  न्यायाधीश के. एस. होरे यांनी सहा जिल्हा सरकारी वकील अॅड आर. सी. शहा यांचा युक्तीवाद ग्राहय धरून दि. १९ जुलै  रोजी आरोपीस प्रथमतः दोषी धरत फाशीची शिक्षा सुनावली. तसेच पोक्सो कायदयाअंतर्गत २० वर्षे सश्रम करावास व १ लाख रूपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडीतेचे आई व वडील यांना देण्याचा आदेश केला.

 

या प्रकरणी विवेक लावंड उपविभागीय पोलीस अधिकारी पाटण, तत्कालीन तपासी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक संतोष पवार, अभिजीत चौधरी सहा. पोलीस निरिक्षक, ढेबेवाडी पो.स्टे. यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी महिला पोलिस कॉन्स्टेबल योगिता पवार यांनी सदर खटल्याचे कामकाज पाहिले. 

 ३५ वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

  पश्चिम महाराष्ट्रात कराड येथील विशेष सत्र न्यायालयाने पहिल्यांदाच फाशीची शिक्षा सुनावली. ३५ वर्षातील पहिलीच घटना आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निकालाचा अखेर आज शेवट झाला.



©2024. All Rights Reserved.