चव्हाण गटाचे स्टार प्रचारक कम तमाशाच्या फडात नाच्या शोभावा अशा चिखलीच्या आप्पाने महिलांवर भर व्यासपीठावरून चिखलफेक केली. या घटनेचा इतिवृतातांत....
म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो...!
महिलांच्या सभेत चीखलीकराने उधळलेली मुक्ताफळे
बाबांचे मौन तर महिला संतप्त
पराग शेणोलकर
कराड-
स्वतःला कराडची ओळख म्हणून स्वत:च घोषित पृथ्वीराज बाबा महिलांच्या सन्मानासाठी निवडून आल्यावर महालक्ष्मी योजना आणणार आहे म्हणे. पण याच बाबांच्या प्रचार सभेत अश्लील आणि पाचकट भाषेत चव्हाण गटाचे स्टार प्रचारक कम तमाशाच्या फडात नाच्या शोभावा अशा चिखलीच्या आप्पाने महिलांवर भर व्यासपीठावरून चिखलफेक केली. तरीही बाबा गप्पच. आणि म्हणे, आम्ही महिलांचा सन्मान करतो.
त्याचे झाले असे की, कराडात चव्हाण गटाची एका हॉटेलात पहिली सभा झाली. या सभेत महिलांना विरोधकांनी साड्या वाटल्या असल्याचे सांगत आप्पाने आपल्या जवळ नसलेली अक्कल पाजवळली. आप्पा गप्पा मारताना म्हणाला, 'साड्या वाटायला आमच्या बायका काय उघड्या बसल्या आहेत का?' महिलांच्या समोरच व्यासपीठावरून अशी बरळ ओकली. आणि व्यासपीठावर बाबा हजर असतानाही त्यांनी चुप्पी साधली. त्यामुळे महिला सन्मानाच्या नुसत्याच गप्पाच मारल्या जातात, हे यावरून स्पष्ट झालं.
कराड दक्षिणच्या फडात अनेकजण आता घुमाय लागलेत. कधी चिपट-मापट्यावर तर कधी आदुली शेरावरचे तोंडाळवीर याठिकाणी कमी नाहीत. असाच एक आप्पा सध्या बडबडाय लागला. आप्पाचे बडबडणे म्हणजे, 'बालिश बहु बायकांत बडबडला', या महाभारतातील एका प्रसंगाप्रमाणे आहे. त्याला त्याच्या बोलवत्या धन्याने बोलताना आठवण करुन देणे आवश्यक आहे. चिखलीकर, हो आजच्या पगारापुरत काम झालय अशा शब्दात....
आप्पा तसा बिलंदर. घरंगळणारी घागर एक वेळ बुड टेकल...पण याच नाही. माईक घावला की थेट चिखलीतून कराडात, तिथून कासेगाव, वाटेगाव करत हा गडी मुंबईतील सह्याद्री, वर्षा बंगल्यावरुन थेट दिल्लीपर्यंत बोलायच्या ओघात पोहोचतो. तसा करमणुकीचा गडी. करमत नसल..वेळ जात नसल की त्याला कराड दक्षिणचा गड राखणाऱ्याकडे हा असायचा. सभेत हसवून बेजार करायचा. त्यावेळी ते गडकोटदार म्हणायचे...आप्पा बास झालय पगारापुरत काम. तसच ह्यो आता आंतरराष्ट्रीय बाबाच्या तालमीत आणि फडात घुमाय लागलाय. कराडच्या एका हॉटेल सभेत आप्पा भलताच घसरला. 'साड्या वाटायला आमच्या बायका काय उघड्या बसल्या आहेत का?' आता बघा हे असे बोलणे. अशा बोलणाऱ्याला दटवायचे सोडल आणि सुसंस्कृत, उच्चविद्याविभुषित बाबा त्याला प्रोत्साहन देत होते. तसा गडी जरा वाईच भेडबत्ताशाचा धनी. पण आपण लयच भारी बोलतो... या हवेत तो नेहमी असतो. त्याच झाल अस हाटेलातील ती सभा गाजवायला त्यो उभारला. आणि हळूहळू त्याच्या तोंडाचा नाडा सुटाय सुरुवात झाली. उत्साहाच्या भरात काय बोलतोय आणि काय नाय ह्याच भान राहिल नाय. भुईची माती घेवून लागला गुलाल म्हणून आभाळात उधळाय. त्याला वाटल झाल आता, मैदान मारल. पण आता त्याचा विपरीत परिणाम समोरच्या माताभगिनींवर.
त्या म्हणाल्या, ह्यो तर बालिश दिसतोय. तसा बालिश बहु बायकांत बडबडला, या महाभारतातील प्रसंगावरील मोरोपंत यांच्या कवितेतल्या उत्तरासारखा. पूर्वी यात्रा - जत्रांच्या काळात गावागावात तमाशाचे फड उभा राहायचा. या फडात एक नाच्या ठरलेला असायचा. जो फक्त गण, गौवळणीत दिसायचा. असाच एक नाच्या काँग्रेसच्या फडात गण, गौवळण गात फिरतो. व्यासपीठावरून तमाशात बोलल्यासारखे महिला, भगिनींसमोर बरळतो. मग अशा आप्पालां जवळ करून महिलांचा मान सन्मानच ठेवायचा नाही अशी भूमिका बाबांनी घेतलेली दिसते.
मताची भीक मागणाऱ्यानी अपमानित तरी करू नका...
नुकतेच सोशल माध्यमावर एक गाणं फेमस झाला आहे. "आप्पाकडं क्रेडिटचं कार्ड हाय". त्याचप्रकारे काँग्रेसच्या आप्पाकडं "लायकी घालवायचं कार्ड हाय" का काय? हे बुद्धिमान बाबाला कळायला हवं की नको. त्यामुळे कराड दक्षिण मतदार संघात संतप्त झालेल्या अनेक महिला माता भगिनी आम्ही काय वाटलेल्या साड्यावर जगतो की काय? आणि अशी कोणाची भावना किंवा तर्क असेल तर त्यांनी तो त्यांच्याकडेच ठेवावा. महिलांचा सन्मान ठेवता आला नाही तर किमान मताची भिक मागायला बोलवून अपमान तरी करू नये, अशा संतप्त भावना महिला वर्गातून व्यक्त होत आहेत.
©2024. All Rights Reserved.