मलवडी. ; निवडणूक आयोगाच्या मतदान कार्डास आधार नंबर जोडणी करणे , ई पिक पाणी नोंद करणे तसेच इतर केवायसी बाबतच्या मार्गदर्शक सुचना देण्यासाठी माण तालुक्यातील मंडलाधिकारी, तलाठी , पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक, पर्यवेक्षक, बीएलओ यांची एकत्रित बैठक माण खटावचे प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिल कार्यालय माण येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते .
पिक पाण्याची नोंद आता तलाठी करणार नसुन ती शेतकऱ्यांनी स्वतः करावी त्यासाठी सर्वांनी जनजागृती करून ते काम लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे . शेतकऱ्यांनी नोंदी न केल्यास कोणत्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा फायदा होणार नसुन त्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याची माहिती प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी दिली . तसेच पी. एम. किसान योजनेची केवायसी पुर्ण करावी अशा सुचना देण्यात आल्या . यावेळी मतदान कार्ड व आधार कार्ड जोडणीच्या केवायसीचे काम चांगले केले आहे त्यां बीएलओच्या कामाचे कौतुकही प्रांताधिकारी यांनी केले . तर ज्यांचे काम कमी आहे त्या बीएलओ यांचेवर शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कामात कुचराई केलेबद्दल कारवाई करण्याचे आदेश दिले .
पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका यांनी कोव्हिड कालावधीत चांगले काम केले असुन केवायसी च्या कामातही उल्लेखनीय काम करावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली .
यावेळी माण चे प्रभारी तहसीलदार श्रीशैल व्हट्टे , गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील , तालुका कृषी अधिकारी सुहास राणशिंग, तालुक्यातील सर्व कृषी सहाय्यक, तलाठी,ग्रामसेवक, पोलीस पाटील, कोतवाल उपस्थित होते .
©2025. All Rights Reserved.