सातारा : माथाडी कामगारांच्या शासनाच्या कामगार, गृह, पणन खात्याअंतर्गत प्रलंबित विविध प्रश्नांची येत्या एक महिन्याच्या आंत सोडवणुक करण्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना. सुरेशजी खाडे यांनी संह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झालेल्या सर्व संबंधितांच्या बैठकित दिले. महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसंदर्भातील निवेदन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना. सुरेशजी खाडे यांना सादर केले होते, त्यासंदर्भात त्यांनी संह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सर्व संबंधितांची बैठक आयोजित केली होती, त्यावेळी कामगार मंत्र्यांनी सविस्तर चर्चा करुन हे आश्वासन दिले. या बैठकिस कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंगल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, उप सचिव दादासाहेब खताळ, अव्वर सचिव दिपक पोकळे, दिलीप वणिरे, सह कामगार आयुक्त शिरीन लोखंडे, डीजीपी ऑफिसचे एम. रामकुमार, डीसीपी स्पेशल ब्रँचचे मोहन चिमटे, गृह विभागाचे उप सचिव संजय खेडेकर, पणनचे सह सचिवसुग्रीव धपाटे, पणनचे सह संचालक विनायक कोकरे, मुंबई- कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव संदिप देशमुख, उप सचिव विजय शिंगाडे, अधिकारी फयाज मुलाणी, पणनचे मनोज वांगड, कामगार उपायुक्त व ग्रोसरी बोर्डाचे चेअरमन बाळासाहेब वाघ, महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, कार्याध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे, गुलाबराव जगताप, युनियनचे अध्यक्ष एकनाथ सखाराम जाधव, चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, सेक्रेटरी कृष्णा पाटील, नाशिक, पुणे विभागाचे सेक्रेटरी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते. माथाडी सल्लागार समितीवर अनुभवी कामगार नेत्यांची नियुक्ती करावी, सल्लागार समितीच्या वेळावेळी संयुक्त बैठका घ्याव्या, माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन त्यावर कामगारांचे प्रतिनिधीत्व करणा-या अनुभवी कामगार नेत्यांच्या नेमणुका कराव्या, माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांची भरती करावी, माथाडी मंडळात चेअरमन व सेक्रेटरी यांच्या नेमणुका करणे, कामगार विभागाने काढलेला दि.०५/०३/२०१९ चा पतपेढ्यांबाबत काढलेला शासन जीआर रद्द करणे, फॅक्टरीमध्ये माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेची अंमलबजावणी होणे, माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेतील त्रुटी दूर करणे, मे. टाटा मोटर्स लिमिटेड (इंडिका व मटेरिअल गेट) पिंपरी, पुणे येथील माथाडी बोर्डाच्या टोळी नं. ४९५ च्या प्रश्नांची सोडवणुक करणे, विविध रेल्वे यार्डात सुविधा उपलब्ध करुन देणे, माथाडी हॉस्पीटलच्या कामकाजाच्या चौकशीचा अहवाल समितीकडून तातडीने सादर करणे, कोल्हापूर रेल्वे यार्डातील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक करणे, माथाडी कामगारांच्या हक्काच्या कामात अडथळा आणून कामगारांवर गुंडगिरी करणा-यांचा बंदोबस्त करणे, नोंदीत माथाडी कामगारांना हक्काचे काम करण्यास पोलीस संरक्षण देणे, नाशिक येथिल कामगारांच्या लेव्हीच्या व नामपूर बाजार समितीतील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक करणे, मापाडी कामगारांना बाजार समितीच्या सेवेत घेणे आदी प्रश्नांचे निवेदन महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी कामगार मंत्री ना. सुरेशजी खाडे यांना सादर केले होते, यासंदर्भात सर्व संबंधितांशी तब्बत तीन तास सविस्तर चर्चा करुन मंत्री महोदय यांनी माथाडी कामगारांचे प्रलंबित न्याय प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले व अधिका-यांना सूचना केल्या. माथाडी कामगारांच्या प्रलंबित न्याय प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी कामगार मंत्री ना. सुरेशजी खाडे यांनी तातडीने संबंधित अधिका-यांची बैठक आयोजित केली व पहिल्याच बैठकित चांगले निर्णय घेतले, त्याबद्दल माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांनी संघटनेच्या व तमाम माथाडी कामगारांच्यावतिने आभार व्यक्त केले.
©2025. All Rights Reserved.