मेढा : एका गावामध्ये यात्रा होती त्या यात्रेच्या दरम्यान संबंधित पंचायत समिती मधील कक्ष अधिकारी श्री पंधारे, यांनी शासकीय कामकाजाच्या वेळेत आपल्या पदाचा गैरवापर करत त्या यात्रेच्या गावांमध्ये मटन झोडायला उपस्थिती लावली. शासकीय वेळेमध्ये त्यांनी कोणत्याही परवानगीची तमा न बाळगता गट विकास अधिकारी श्री काळे यांच्या शासकीय बोलेरो गाडीचा अनधिकृतपणे बेकायदेशीर रित्या वापर करून गेले होते यानंतर यांची तक्रार गटविकास अधिकारी श्री काळे यांना केली होती.मात्र काळे यांनी श्री पंधारे पाठीशी घालण्यात धन्यता मानली. तदनंतर ही तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. सातारा यांना देण्यात आली जि. प.सातारा या कार्यालयाकडून सदर यांना आठ दिवसांमध्ये आपला अहवाल सादर करणे अनिवार्य आहे असे पत्रही काढण्यात आले आज अखेर संबंधित कर्मचाऱ्यांनी कोणत्याही पद्धतीचा अहवाल जि. प. सातारा कार्यालयाला दिला नाही.त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पत्रालाच संबंधित पंचायत समिती जावली मधील अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवून पत्राचा अवमान केला आहे त्यामुळे सदर प्रकरण गंभीर असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कक्ष अधिकारी श्री.पंधारे सहित व गटविकास अधिकारी श्री काळे यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करून पदाचा गैरवापर करणाऱ्या कक्ष अधिकारी श्री पंधारे यांना तात्काळ निलंबित करा असे न झाल्यास लोकशाहीतील मार्गाने तीव्र आंदोलन छेडणार
©2025. All Rights Reserved.